महिला मैत्रिणीच्या बाथरूममध्ये लावला सीक्रेट कॅमेरा, लॅपटॉपमध्ये सापडले शेकडो व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:04 IST2022-12-12T13:04:17+5:302022-12-12T13:04:30+5:30

China : बऱ्याच दिवसांपासून तिच्यापासून मला वेगळं व्हायचं होतं. त्यामुळे मी तिचे प्रायव्हेट व्हिडीओ बनवले. जेणेकरून तिच्या मनात माझ्याविषयी द्वेष तयार होईल. आणि ते वेगळे होतील.

Man installed camera in woman bathroom made private videos | महिला मैत्रिणीच्या बाथरूममध्ये लावला सीक्रेट कॅमेरा, लॅपटॉपमध्ये सापडले शेकडो व्हिडीओ

महिला मैत्रिणीच्या बाथरूममध्ये लावला सीक्रेट कॅमेरा, लॅपटॉपमध्ये सापडले शेकडो व्हिडीओ

China : महिला मैत्रिणीचे प्रायव्हेट व्हिडीओ काढण्याच्या गुन्ह्यासाठी एका व्यक्तीला तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या लॅपटॉपमधून शेकडोच्या संख्येने महिलेचे प्रायव्हेट व्हिडीओ आणि फोटो आढळून आले. नंतर व्यक्तीने अजब तर्क देत सांगितलं की, त्याने महिलेच्या मनात त्याच्याविषयी द्वेष तयार करण्यासाठी असं काम केलं.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, 52 वर्षीय या व्यक्तीचं नाव लुओ शियाओदोंग आहे. विवाहित लुओ ड्रायव्हर आहे. सध्या तो न्यूझीलॅंडमध्ये राहतो. त्याला त्याच्या एका महिला मैत्रिणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवण्याच्या गुन्ह्यात तुरूंगवास झाला आहे.

लुओ म्हणाला की, मी अनेक वर्षांपासून या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. बऱ्याच दिवसांपासून तिच्यापासून मला वेगळं व्हायचं होतं. त्यामुळे मी तिचे प्रायव्हेट व्हिडीओ बनवले. जेणेकरून तिच्या मनात माझ्याविषयी द्वेष तयार होईल. आणि ते वेगळे होतील.

लुओ असंही म्हणाला की, हे प्रायव्हेट व्हिडीओ त्याने त्याच्या सेक्शुअल गरजांसाठीही तयार केले होते आणि त्याचा दुसरा कोणता उद्देश नव्हता. त्याला फक्त हेच वाटत होतं की, महिलेच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण व्हावा.

कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनुसार, लुओने यावर्षी जानेवारीमध्ये आणि मार्चमध्ये महिलेच्या बाथरूममध्ये एक कॅमेरा फिट केला होता. त्याने 17 वेळा तिचे वेगवेगळे व्हिडीओ तयार केले. नंतर ते आपल्या लॅपटॉपवर सेव्ह केले. महिलेने एकदा लॅपटॉप पाहिला तेव्हा तिला हे सगळं समजलं.

तिचे असे फोटो आणि व्हिडीओ बघून ती चांगलीच संतापली आणि लगेच पोलिसांना बोलवलं. चौकशी दरम्यान लुओने मान्य केलं की, त्यानेच हे व्हिडीओ आणि फोटो बनवले. याबाबत लांबलचक सुनावणीनंतर कोर्टाने त्याला सहा महिन्यांची तुरूगंवासाची शिक्षा सुनावली.  

Web Title: Man installed camera in woman bathroom made private videos