शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

मैत्रीणीच्या वेदना समजून घेण्यासाठी मित्राने केला 'असा' अभ्यास, जगातल्या सर्वात खतरनाक तुरूंगात डांबलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:06 PM

वाइस वर्ल्ड न्यूजसोबत बोलताना सोहेला म्हणाली की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा अहमदच्या एका मैत्रिणीला इजिप्तमध्ये गर्भपाताच्या भयानक अनुभवातून जावं लागलं होतं.

इजिप्तमधील एका कॉलेज विद्यार्थ्याला अंदाजही नव्हता की, जेंडर स्टडीज केल्यामुळे त्याला तुरूंगात डांबलं जाईल. ऑस्ट्रियाच्या सेंट्रल यूरोपियन यूनिव्हर्सिटीमध्ये सोशिओलॉजी आणि एंथ्रोपोलॉजीचा विद्यार्थी अहमद याला त्याच्या रिसर्चच्या विषयामुळे जगातील सर्वात खतरनाक तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. अहमदची गर्लफ्रेन्ड सोहेला बेल्जिअमध्ये शिकते आणि दोघेही अनेक वर्षांपासून लॉंग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये आहे.

वाइस वर्ल्ड न्यूजसोबत बोलताना सोहेला म्हणाली की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा अहमदच्या एका मैत्रिणीला इजिप्तमध्ये गर्भपाताच्या भयानक अनुभवातून जावं लागलं होतं. तो तिच्या अनुभवामुळे फार इमोशनल झाला होता.सोहेला म्हणाली की, अहमदने निर्णय घेतला होता की, तो त्याचा मास्टर्सचा रिसर्च इजिप्त आणि इस्लामच्या गर्भपात कायद्याच्या तुलनेवर करेल. अहमद जेव्हा ऑस्ट्रियातून इजिप्तमध्ये परत येत होता तेव्हा शेरम अल शेख इंटरनॅशनल एअरपोर्टवर त्याच्या जेंडर स्टडीच्या पुस्तकावरून अधिकाऱ्यांनी त्याला विचारपूस केली.

सोहेला पुढे म्हणाली की, विचारपूस केल्यावर त्याला जाऊ दिलं गेलं. मात्र, एका आठवड्यानंतर त्याच्या घरी पोलीस आले आणि त्याला कायरोतील लिमान टोरा तुरूंगात कैद केलं. या तुरूंगाबाबत सांगितलं जातं की, इथे पॉलिटिकल कैद्यांसोबत अमानवीय कृत्य केलं जातं आणि हा तुरूंग इजिप्तमधील सर्वात जास्त सिक्युरिटी असलेला तुरूंग आहे. 

या तुरूंगाची कंडीशन फार कठोर आहे आणि या तुरूंगातील कैद्यांचा बाहेरील जगाशी काहीही संबंध नसतो. गेल्या काही काळात इथे काही गोष्टी बदलल्या आहेत. अहमदचा परिवार त्याला महिन्यातून एकदा भेटू शकतो. त्याच्यासाठी कपडे आणि जेवण पाठवलं जाऊ शकतं. तुरूंगाच्या नियमांनुसार, सोहेला अहमदला भेटू शकत नाही. कारण दोघांचं अजून लग्न झालेलं नाही.

याआधी अहमदचा मित्र पॅट्रिक जॉर्ज यालाही फेब्रुवारी २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. इटलीच्या युनिव्हर्सिटीमध्ये जेंडर स्टडीजचा अभ्यास करणार जॉर्जवरही अशाप्रकारे दहशतवादाचे आरोप लावण्यात आले होते. यावर्षी एप्रिलमध्ये इटलीतील प्रशासन त्याला सिटीजनशिप मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरून जॉर्जला तुरूंगातून बाहेर येण्यास मदत मिळेल.

दरम्यान, सोहेला याप्रकरणी एमनेस्टी इंटरनॅशनल, स्कॉलर्स एट रिस्क, ह्यूमन्स राइट्स वॉच आणि व्हिएनाच्या स्टुडंट यूनियनला भेटली आहे. तिने अहमदच्या सुटकेसाठी विनंती केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अहमदच्या सुटकेसाठी बरीच आंदोलने बघायला मिळाली. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयjailतुरुंगResearchसंशोधन