एकाच वेळी पाच जणींसोबत सुरू होतं त्याचं अफेअर, असं फुटलं बिंग आणि झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:03 IST2022-03-28T15:02:27+5:302022-03-28T15:03:13+5:30
Man Affair With Five Womans: एका व्यक्तीने एकाचवेळी पाच महिलांसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. यामधील एक महिला सदर व्यक्तीची प्रेयसी होती. अखेर आपला बॉयफ्रेंड आपल्याला फसवत आहे, याची या तरुणीला अचानक जाणीव झाली.

एकाच वेळी पाच जणींसोबत सुरू होतं त्याचं अफेअर, असं फुटलं बिंग आणि झाली अशी अवस्था
लंडन - कुठल्याही नात्यासाठी विश्वास सर्वाधिक आवश्यक असतो. जर विश्वासच संपला तर दुरावा वाढू लागतो. मात्र तरीही अनेकजण नात्यामध्ये असूनही फसवणूक करतात आणि अफेअर सुरू करतात. अशीच एक घटना इंग्लंडमधून समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने एकाचवेळी पाच महिलांसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. यामधील एक महिला सदर व्यक्तीची प्रेयसी होती.
दरम्यान, तिच्या प्रियकराचे तिच्याव्यतिरिक्त चार अन्य महिलांसोबत प्रेमसंबंध आहेत, हे जेव्हा तिला समजले तेव्हा तिला धक्काच बसला. या २७ वर्षीय तरुणीने तिच्या माजी प्रियकराबाबत धक्कादायक दावा केला आहे. तरुणीने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून ती तिच्या बॉयफ्रेंडला डेट करत आहे. मात्र तिच्या अपरोक्ष तो चार अन्य महिलांसोबत संबंध ठेवून आहे, हे तिला आताच समजले आहे.
आपला बॉयफ्रेंड आपल्याला फसवत आहे, याची या तरुणीला अचानक जाणीव झाली. दरम्यान, तिच्या बॉयफ्रेंडचे ज्या महिलांशी संबंध होते, त्या सर्व महिला कुठल्या ना कुठल्या प्रकारे या तरुणीशी संबंधित होत्या. तिचा बॉयफ्रेंड या गोष्टींबाबत उघडपणे बोलायचा. आपण काहीतरी शौर्याचं काम करत आहोत, असा त्याचा आव असायचा. या तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडशी अफेअर होते, त्या महिलेला सोशल मीडियावर फॉलो करण्यास सुरुवात केली.
धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचे ज्या पाच महिलांशी संबंध होते. त्या एकमेकींना ओळखत होत्या. दरम्यान, एका महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकल्याचे या तरुणीने पाहिले. तिथेच या तरुणाचे बिंग फुटले. तिचा बॉयफ्रेंड तिली फसवणूक करत असल्याची तिला जाणीव झाली. हळुहळू तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत अफेअर असलेल्या इतर चार महिलांचाही शोध लागला. यातीस एक महिला तर त्या तरुणीची डॉक्टर होती. दुसरी मुलगी तिच्या नातेवाईकाची मैत्रिण होती. तिसरी तरुणी तिला एका पार्टीमध्ये भेटली होती.
दरम्यान, या तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडकडून होत असलेल्या फसवणुकीची माहिती या चारही तरुणींना दिली. त्यानंतर या पाचही जणींनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मग त्या पाचही जणी त्या बॉयफ्रेंडला एकत्रच भेटण्यासाठी निघाल्या. या पाचही जणींना एकत्र पाहून हा तरुण गांगरला. तसेच माफी मागू लागला. मात्र या पाचही जणींनी त्याच्यासोबत असलेलं नातं तिथेच संपुष्टात आणलं. आता या पाचही महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. तसेच त्यांच्यापैकी कुणीही आता त्या तरुणाच्या संपर्कात नाही.