शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 30, 2020 09:50 IST

महातिर यांनी गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी फ्रान्सविरोधात अत्यंत प्रक्षोभक शाष्य केले आहे.

ठळक मुद्देमहातिर यांनी गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी फ्रान्सविरोधात अत्यंत प्रक्षोभक शाष्य केले आहे.मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.महातिर यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक, असे एकूण 14 ट्विट केले आहेत.

क्वालालंपूर -फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण जगात निंदा होत असताना आणि संपूर्ण जग फ्रान्सच्या दुःखात सहभागी झाले असतानाच, मलयेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी अत्यंत प्रक्षोभक विधान केले आहे. मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.

महातिर यांनी गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी फ्रान्सविरोधात अत्यंत प्रक्षोभक शाष्य केले आहे. 'इतरांचा सन्मान करा' या नावाने लिहिण्यात आलेल्या या ब्लॉगमध्ये महातिर यांनी नीस हल्ल्याचा थेट उल्लेख केलेला नाही. महातिर यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक, असे एकूण 14 ट्विट केले आहेत. यात त्यांनी मुसलमानांसोबत भेदभाव होत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर फ्रान्सने पूर्वी मुसलमानांवर जे अत्याचार केले, त्यासाठी मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांची कत्तल करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मोहम्मद यांनी म्हटले आहे.

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला; महिलेचा गळा चिरला, तिघांचा मृत्यू   महम्मद यांनी, चेचन्याई विद्यार्थ्याने फ्रेंच शिक्षक सॅमुअल पेटच्या हत्येचा उल्लेख करत लहिले, "मुस्लिमांना रागावण्याचा अधिकार आहे. पूर्वी केल्या गेलेल्या नरसंहारासाठी फ्रन्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, अद्याप मुस्लीम 'डोळ्याच्या बदल्यात डोळ्या'कडे वळलेले नाहीत. फ्रान्सने आपल्या नागरिकांना दुसऱ्याच्या भावनांचा विचार करण्याची शिकवण द्यायला हवी"

Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार

फ्रान्समधील नीस शहरात असलेल्या नॉट्रडम चर्चमध्ये एका हल्लेखोराने एका महिलेचा चाकूने गळा कापून हत्या केली. यात इतर दोघांचाही मृत्यू झाला आहे. हा  20 वर्षांचा हल्लेखोर इटलीमार्गे फ्रान्समध्ये आला होता, असे अतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हातात कुरान आणि चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला होता. शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Franceफ्रान्सMuslimमुस्लीमIslamइस्लामTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी