Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार

By प्रविण मरगळे | Published: October 30, 2020 08:10 AM2020-10-30T08:10:01+5:302020-10-30T08:11:35+5:30

France Nice Terror Attack News: ट्युनिशियाच्या हल्लेखोराने हातात कुराण धरले होते. त्याने चर्चमध्ये प्रवेश केला आणि धारदार चाकूने लोकांवर हल्ला केला

France Nice Terror Attack Tunisian Attacker Carrying Knife And Quran Enters Inside | Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार

Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार

googlenewsNext
ठळक मुद्देचाकूने वार करून तीन जणांना ठार केले. काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्येही अशीच एक घटना घडली होतीहल्लेखोराने महिलेचा गळा कापला आणि इतर दोन जणांवर निर्घृण वार केले.फ्रान्सवरील हल्ला देशाच्या स्वातंत्र्याचे मूल्य आणि दहशतीपुढे झुकू नयेत या उद्देशाने केला गेला.

नीस - फ्रान्समधील नीस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अँटी टेररिझम प्रोसीक्युटरच्या म्हणण्यानुसार, नीसच्या चर्चमध्ये घुसून तीन जणांना ठार मारणारा व्यक्ती हा ट्युनिशियाचा नागरिक आहे. २० वर्षांचा हा मुलगा इटलीमार्गे फ्रान्समध्ये दाखल झाला होता. हल्लेखोर हातात कुराणच पुस्तक आणि चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला होता असं तपासात आढळलं आहे.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या दहशतवादविरोधी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा माणूस भूमध्य सागरी भागातल्या लम्पेडुसा या बेटावरुन २० सप्टेंबरला इटलीला आला होता. त्यानंतर तो ९ ऑक्टोबर रोजी इटलीहून पॅरिसला पोहोचला. त्याच्या फ्रान्सला पोहोचल्याची माहिती इटालियन रेडक्रॉसच्या एका व्यक्तीच्या कागदपत्रातून समोर आली आहे. ट्युनिशियाच्या हल्लेखोराने हातात कुराण धरले होते. त्याने चर्चमध्ये प्रवेश केला आणि धारदार चाकूने लोकांवर हल्ला केला. नीस शहरात तीन महिन्यांत दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांना इस्लामिक कट्टरतावादाशी जोडले जात आहे. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नीसमध्ये एका व्यक्तीने चाकूने वार करून तीन जणांना ठार केले. काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्येही अशीच एक घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले आहेत की, फ्रान्स पुन्हा 'दहशतवादी हल्ल्याचा बळी पडला आहे'. फ्रान्सवरील हल्ला देशाच्या स्वातंत्र्याचे मूल्य आणि दहशतीपुढे झुकू नयेत या उद्देशाने केला गेला. इतकेच नव्हे तर इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतरही फ्रान्स आपली मूल्ये सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

फ्रान्समध्ये नुकतीच नीस येथील चर्चमध्ये ही घटना घडली जिथे हल्लेखोराने महिलेचा गळा कापला आणि इतर दोन जणांवर निर्घृण वार केले. या हल्ल्यात ४४ आणि ६० वर्षांच्या दोन महिलांसह ५५ वर्षांच्या वृद्ध पुरुषाचा मृत्यू झाला. पॅरिसप्रमाणेच येथील घटनेला दहशतवादी हल्ला संबोधलं आहे. नीसचे नगराध्यक्ष ख्रिश्चन इस्तोर्सी यांनी सांगितले की, नॉट्र डेम चर्चमधील घटनेनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. फ्रान्स दहशतवादविरोधी पथक सध्या या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.

Web Title: France Nice Terror Attack Tunisian Attacker Carrying Knife And Quran Enters Inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.