शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban Crisis: तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा; शांतता नोबेल विजेती मलालाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:05 IST

Afghanistan Taliban Crisis: या संपूर्ण रक्तरंजित धुमश्चक्रीवर शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली पहिली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्देतालिबानने अफगानिस्तानवर ताबा मिळवल्याचे बघून आम्हाला प्रचंड धक्का बसलाजागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक सत्तांनी अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालावेनोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझईने व्यक्त केली प्रतिक्रिया

नवी दिल्ली:अफगाणिस्तानवरतालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानाततालिबानचे राज्य परत आले आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळवला. यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला आहे. यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण रक्तरंजित धुमश्चक्रीवर शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली पहिली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. (malala yousafzai says we watch in complete shock as taliban take control of afghanistan)

तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आणि मुजाहिद्दीनसाठी हा दिवस खूप मोठा आहे. २० वर्षांचे बलिदान आणि मेहनत फळाला आली आहे. अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे स्वरूप काय असेल, ते लवकरच स्पष्ट होईल. तालिबान संपूर्ण जगापासून दूर राहू इच्छित नाही आणि आम्हाला शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध हवे आहेत, असे तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी म्हटले आहे. या एकूणच प्रकरणावर मलालाने आपली प्रतिक्रिया ट्विटरवरून मांडली आहे. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

आम्हाला प्रचंड धक्का बसला

तालिबानने अफगानिस्तानवर ताबा मिळवल्याचे बघून आम्हाला प्रचंड धक्का बसला. मी तिथल्या महिला, अल्पसंख्य आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांविषयी खूप चिंतेत आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक सत्तांनी अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालावे अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी आणि नागरिकांना व निर्वासितांना संरक्षण द्यावे, असे ट्विट मलालाने केले आहे. 

‘शांततापूर्ण हस्तांतर’ करावे असे आवाहन

अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे ‘शांततापूर्ण हस्तांतर’ करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले होते. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तालिबानी लोक राष्ट्रपती भवनात बसलेले दिसत आहेत. तालिबानच्या एका नेत्याने बंडखोर वेगवेगळ्या प्रांतातून पुन्हा एकत्र येत आहेत आणि नवीन शासन संरचना तयार करण्यासाठी परदेशी सैन्य निघून जाण्याची वाट पाहत आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच अफगाणांना दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि नागरिकांना घाबरवण्यासाठी काहीही करू नका, असे आदेश तालिबानींना देण्यात आले आहेत.

“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

दरम्यान, मलालाने देखील तालिबानशी दीर्घकाळ वैचारिक संघर्ष केला आहे. २०१२ मध्ये पाकिस्तानातील तालिबानचा माजी प्रवक्ता एहसानुल्लाह एहसानने मलालावर गोळी झाडली होती. त्यानंतर मलालाच्या संघर्षाला अधिक धार आली. २४ वर्षीय मलालाला २०१४ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. तिला नोबेल पुरस्कार देण्यात आले, त्यावेळी तिचे वय अवघे १७ वर्षे होते. 

टॅग्स :Malala Yousafzaiमलाला युसूफझाईAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान