करार करा अन्यथा परिणाम भोगा; इराणवर 'अंतिम प्रहार'ची तयारी? अमेरिकेचा मोठा गेम प्लॅन तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 06:32 IST2026-03-27T06:31:34+5:302026-03-27T06:32:37+5:30

ट्रम्प यांचा इराणला खणखणीत इशारा : अजूनही वेळ गेलेली नाही, आमच्याशी चर्चा करा; उशीर केलात तर खबरदार

make a deal or face the consequences preparing for a final strike on iran america big game plan ready | करार करा अन्यथा परिणाम भोगा; इराणवर 'अंतिम प्रहार'ची तयारी? अमेरिकेचा मोठा गेम प्लॅन तयार!

करार करा अन्यथा परिणाम भोगा; इराणवर 'अंतिम प्रहार'ची तयारी? अमेरिकेचा मोठा गेम प्लॅन तयार!

वॉशिंग्टन : युद्धविरामाच्या प्रस्तावावर अमेरिकेसोबत इराणच्या नेत्यांनी चर्चा करावी, अजूनही वेळ गेलेली नाही. मात्र, खूप उशीर झाला तर मग पुन्हा मागे वळण्याचा मार्ग नाही, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इराणला दिली. 

अमेरिकेचा १५ कलमी युद्धविरामाचा पाकिस्तानच्या मध्यस्थीद्वारे इराणकडे पाठविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रस्ताव ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, युद्धविरामाच्या प्रस्तावावर नीट विचार करून इराणने अमेरिकेशी करार करावा, असे इराणला मी आवाहन करत आहे. 

इराणच्या उर्जा प्रकल्प व संसाधनांवर ५ दिवस हल्ले करणार नाही, अशी घोषणा ट्रम्प यांनी २३ मार्च रोजी केली होती. त्यानंतर अमेरिकेने सादर केलेला युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने धुडकावून लावला होता. तसेच होर्मुझवरील आमचे सार्वभौमत्व व अधिकार मान्य करा, युद्धामध्ये जे नुकसान झाले, त्याची भरपाई द्या, अशा अटी घालणारा युद्धविराम प्रस्ताव इराणने अमेरिकेला पाठविला होता. या घडामोडींमुळे हे युद्ध आणखी पेटणार हे स्पष्ट झाले आहे.

होर्मुझ बंद करणारा इराणचा कमांडर ठार

भारतासह पाच देशवगळता अमेरिका व अन्य देशांच्या व्यापारी जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास बंदी घालणारे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सचे (आयआरजीसी) नौदल कमांडर अलिरेझा तांगसिरी हे इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. ही घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी गुरुवारी केली. मात्र, त्याला इराणने अद्याप दुजोरा दिलेला नाही. २०१८पासून तांगसिरी कमांडर इराणच्या नौदलात कार्यरत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत शत्रूदेशांच्या जहाजांची कोंडी करण्याच्या मोहिमेचे तेच प्रमुख होते.

कोरोना काळासारखेच भयंकर परिणाम : पुतीन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्षाचे नेमके परिणाम काय होतील, हे अचूकपणे सांगणे कठीण आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे जो हाहाकार माजला होता, तशी परिस्थिती या युद्धामुळे जगात ओढवू शकते.

इराणविरूद्धच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय उत्पादन आणि पुरवठा साखळ्या यावर विपरीत परिणाम होत आहे. हायड्रोकार्बन, धातू आणि खत उत्पादक कंपन्यांचे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत, असेही पुतीन म्हणाले.

क्षेपणास्त्रांच्या अवशेषामुळे भारतीयासह दोघांचा मृत्यू

अबूधाबीवर इराणने मारा केलेले क्षेपणास्त्र तेथील संरक्षण प्रणालीद्वारे पाडल्यानंतर त्या क्षेपणास्त्राचे अवकाशातून कोसळलेले अवशेष अंगावर पडले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका भारतीय व एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश असल्याचे अबुधाबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

युद्धविरामासाठी इराण करतोय विनंती : ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, युद्धविरामाचा करार करण्यासाठी मी नव्हे तर इराण विनंती करत आहे. ते करार करण्यासाठी आतुर झाले आहेत. त्या देशात जे काही घडत आहे ते पाहिले तर इराण करार करण्यासाठी का तयार झाला हे कोणालाही कळू शकले. इराण हा मूर्ख नाहीत.

ते खूप हुशार असून वाटाघाटी करण्यात तरबेज आहेत. त्यांनी हा करार चार आठवड्यांपूर्वीच करायला हवा होता. अगदी खरे सांगायचे तर त्यांनी असा करार दोन वर्षांपूर्वी किंवा माझ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातच करायला हवा होता. पण तसे झाले नाही.

इराणने दिले 'गिफ्ट'

इराणने १० तेल टैंकरांना मार्ग मोकळा करून देत एकप्रकारे आम्हाला 'भेट' दिली. या टँकरांवर पाकिस्तानचा झेंडा होता आणि या पावलातून इराण विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराणवर 'अंतिम प्रहार'ची तयारी? चारही बाजूंनी घेरण्यासाठी अमेरिकेकडे ४ पर्याय

इराणच्या खार्ग बेटावर कब्जा

इराणच्या खार्ग बेटावर कब्जा किंवा त्याची नाकेबंदी करण्याचा विचार आहे. हे बेट इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र मानले जाते. येथून सुमारे ८० ते ९० टक्के कच्चे तेल बाहेर पाठवले जाते. या बेटावर नियंत्रण मिळवले, तर इराणची अर्थव्यवस्था डळमळू शकते.

लरक बेटावर नियंत्रण मिळवणे

होर्मुज सामुद्रधुनीतील लरक बेटावर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे. या बेटावर इराणची रडार यंत्रणा आणि लष्करी ठिकाणे असून, येथून समुद्री मार्गावर लक्ष ठेवले जाते. यावर कब्जा केल्यास तेल वाहतुकीवर अमेरिकेची पकड अधिक मजबूत होईल.

अबू मूसा बेटावर हल्ला करणे

अबू मूसा बेटावर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फारसच्या आखातातील हे बेट अत्यंत रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, येथून समुद्री मार्गावर नियंत्रण ठेवता येते. या भागावर कारवाई झाल्यास इराणची संरक्षण व्यवस्था कमकुवत होऊ शकते.

इराणच्या जहाजांना अडवणे

इराणच्या तेल निर्यात करणाऱ्या ४ जहाजांना अडवणे किंवा जप्त करणे, तसेच अत्यंत समृद्ध युरेनियमवर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट कारवाई करण्याचा विचारही आहे. यामुळे इराणच्या महसुलावर परिणाम होऊन अणु कार्यक्रमावरही दबाव निर्माण होऊ शकतो.
 

Web Title : समझौता करो या परिणाम भुगतो: अमेरिका ईरान पर 'अंतिम प्रहार' की तैयारी में?

Web Summary : ट्रम्प ने ईरान को बातचीत की चेतावनी दी। अमेरिका, खर्ग द्वीप पर कब्ज़ा, लारक नियंत्रण, अबू मूसा पर हमला और ईरानी जहाजों को रोकने पर विचार कर रहा है, जिससे ईरान की अर्थव्यवस्था और परमाणु कार्यक्रम खतरे में आ सकते हैं। पुतिन ने महामारी जैसे वैश्विक अराजकता की चेतावनी दी।

Web Title : Deal or face consequences: US prepares 'final strike' on Iran?

Web Summary : Trump warns Iran to negotiate. US considers Kharg Island capture, Larak control, Abu Musa attack, and Iranian ship interception, potentially crippling Iran's economy and nuclear program. Putin cautions of global chaos like the pandemic.