युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 18:04 IST2025-10-22T18:00:53+5:302025-10-22T18:04:45+5:30
युगांडामध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि इतर वाहनांची धडक होऊन तब्बल ६३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
युगांडामध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि इतर वाहनांची धडक होऊन तब्बल ६३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. युगांडाची राजधानी कंपालाच्या उत्तरेला असलेल्या गुलू शहराला जोडणाऱ्या कंपाला-गुलू महामार्गावर बुधवारी सकाळी हा अपघात झाला, ज्यामध्ये एका बससह अनेक लहान आणि मोठी वाहनं एकमेकांवर आदळली.
स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या धडकेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. युगांडा पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासानंतर स्थानिक पोलिसांनी या अपघातात दोन बस आणि इतर चार वाहनांचा समावेश असल्याचं सांगितलं. बस चालकाने कंपाला-गुलू महामार्गावर एका लॉरीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाशी धडक झाली.
More than 50 people killed, several others injured in a road accident involving 4 vehicles near Asili Farm on Kampala–Gulu highway, in Ugandan pic.twitter.com/fefcM88Fxc
— MCT DRIVE AFRICA (@mctdriveafrica) October 22, 2025
अचानक झालेल्या या धडकेनंतर मागून येणारी अनेक वाहनं एकमेकांवर आदळली, ज्यामुळे महामार्गावर गोंधळ उडाला. कंपाला पोलिसांनी सांगितलं की, अपघातानंतर बचाव आणि मदत पथकं तैनात करण्यात आली आहेत.
जखमी आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं सक्रियपणे काम करत आहेत. मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींवर पश्चिम युगांडाच्या किरियानडोंगे शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भयानक आणि दुःखद अपघातानंतर कंपाला-गुलू महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. ६३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.