शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Israel Iran War: इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला, नौदल प्रमुख अलीरेझा तंगसिरी ठार? युद्ध पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:32 IST

Alireza Tangsiri News: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने आता एक नवे वळण घेतले आहे. इस्रायलने इराणचे मोक्याचे ठिकाण असलेल्या बंदर अब्बास या बंदर शहरात हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने आता एक नवे वळण घेतले आहे. इस्रायलनेइराणचे मोक्याचे ठिकाण असलेल्या बंदर अब्बास या बंदर शहरात हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे शक्तिशाली नौदल कमांडर अलीरेझा तंगसिरी एका इस्रायली हल्ल्यात ठार झाल्याचा खळबळजनक दावा एका इस्रायली अधिकाऱ्याने केला आहे. या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत गुप्त मोहीम राबवली. या हल्ल्याचा मुख्य केंद्रबिंदू बंदर अब्बास हे शहर होते, जे इराणचे सर्वात महत्त्वाचे नौदल केंद्र मानले जाते. या हल्ल्यात तंगसिरी ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे.

अलीरेझा तंगसिरी कोण होते?

तंगसिरी हे इराणच्या सागरी रणनीतीचे मुख्य सुत्रधार मानले जात होते. त्यांच्या मृत्युच्या दाव्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या नौदलाला समुद्रात थेट आव्हान देणारी विधाने केल्यामुळे ते चर्चेत होते. इराणच्या नौदल शक्तीचा विस्तार आणि बंदर अब्बास सारख्या संवेदनशील तळाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. दरम्यान, तंगसिरी यांच्या मृत्युच्या वृत्ताला अधिकृत पुष्टी मिळाली, तर इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांना आणि विशेषतः नौदल मनोबलाला बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल.

युद्ध पेटण्याची शक्यता

इस्रायलकडून हा दावा करण्यात आला असला तरी, इराणने अद्याप आपल्या सर्वोच्च कमांडरच्या स्थितीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. बंदर अब्बास हा तळ संपूर्ण पर्शियन आखातावर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, तेथील हल्ल्यामुळे इराणच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. आपल्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराण मोठी लष्करी कारवाई करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधील सुरक्षा संकट आणि कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel strikes Iran, naval commander Alireza Tangsiri reportedly killed.

Web Summary : Israel reportedly attacked Iran's Bandar Abbas, potentially killing naval commander Alireza Tangsiri. This escalates Middle East tensions, risking retaliation and impacting oil transport. Iran hasn't confirmed the death.
टॅग्स :Warयुद्धIranइराणIsraelइस्रायल