सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 21:22 IST2025-12-26T21:21:28+5:302025-12-26T21:22:27+5:30
Syria Mosque Blast: सुरक्षा दलांनी मशिदीसह परिसराला वेढा घातला आहे.

सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
Syria Mosque Blast: सीरियामध्ये मोठा हल्ला झाला आहे. होम्समधील एका मशिदीला लक्ष्य करण्यात आले आहे. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १८ जण जखमी झाले आहेत. मशिदीत स्फोटके लावण्यात आली असल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांनी मशिदीसह परिसराला वेढा घातला आहे. बंडखोरांच्या ताब्यातील उत्तर ग्रामीण भागात नमाज पठाणदरम्यान हा स्फोट झाला.
🇸🇾 Suicide bombing at Imam Ali Shiite mosque in Homs, Syria
— NEXTA (@nexta_tv) December 26, 2025
A suicide attacker detonated explosives inside the Imam Ali mosque in Homs during prayers.
At least 12 people have been killed and dozens injured, according to local sources.
Emergency services and security forces are… pic.twitter.com/dlgJflF9GL
सीरियन अरब न्यूज एजन्सीनुसार, मध्य सीरियातील होम्समधील वाडी अल-दहाब जिल्ह्यातील इमाम अली इब्न अबी तालिब मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना होम्समधील करम अल-लुज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मशिदीभोवतीची सुरक्षा वाढवली
गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे की अंतर्गत सुरक्षा युनिट्स घटनास्थळी तात्काळ तैनात करण्यात आले आहेत. मशिदीभोवतीची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की हा स्फोट मशिदीत लावलेल्या स्फोटक उपकरणांमुळे झाला आहे. मात्र अधिक तपास सुरु आहे.
गृह मंत्रालयाने हल्ल्याबद्दल काय म्हटले?
मंत्रालयाने म्हटले आहे की हे स्फोट म्हणजे मानवी आणि नैतिक मूल्यांवर हल्ला आहेत. या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्यांना जबाबदार धरले जाईल. आम्ही सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की स्फोटात अली बिन अबी तालिब मशिदीला लक्ष्य करण्यात आले होते.