इस्लामाबाद - तहरीक ए तालिबान पाकिस्तान (TTP) ने पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. टीटीपीच्या जवानांनी खैबर पख्तूनख्वाच्या दक्षिण वझिरिस्तानमध्ये पाक लष्कर तळाला टार्गेट केले. या हल्ल्यात २५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर ८ जवान जखमी झालेत. सोमवारी रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला असं टीटीपीने म्हटलं परंतु अद्याप पाकिस्तानी लष्कर अथवा कुठल्याही इतर संस्थेने याची पुष्टी केली नाही.
द वॉइस ऑफ खुरासानने मंगळवारी टीटीपीचे निवेदन आणि हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला. त्यात टीटीपीने म्हटलं की, सोमवारी रात्री दक्षिण वझिरिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या चौकीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे एक ड्रोन नष्ट झाले आणि २५ सैनिक मारले गेले. पाकिस्तानी लष्कराच्या या तळावर कब्जा केल्याचाही दावा टीटीपीने व्हिडिओत केला आहे.
आसिफ यांनी दिली होती धमकी
पाकिस्तानी लष्करावर टीटीपीने अशावेळी हल्ला केल्याचा दावा केला आहे जेव्हा पाकिस्तानी सरकारकडून या गटाला धमक्या दिल्या जात होत्या. पाकिस्तानी संरक्षण मत्री ख्वाजा आसिफ यांनी टीटीपीला धमकी दिली होती. कुठल्याही परिस्थितीत आमचे सरकार टीटीपीसोबत चर्चा करणार नाही. पाकिस्तान केवळ अफगाणिस्तानातील तालिबानसोबत चर्चा करेल असं आसिफ यांनी स्पष्ट केले होते.
टीटीपी दिर्घकाळापासून पाकिस्तानी आर्मीला टार्गेट करत आहे. विशेषत: अफगाणिस्तान सीमेपासून नजीक या संघटनेने पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्षाचे एक कारण टीटीपीही हेही आहे. पाकिस्तानी अनेक वर्षापासून अफगाणिस्तानवर तहरीक ए तालिबान टीटीपीला आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे. पाकिस्तान आणि टीटीपी यांच्यातील तणाव वाढला आहे. टीटीपी प्रमुख मुफ्ती नूर वली महसूदला याला टार्गेट करत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला. त्यानंतर महसूदने व्हिडिओ जारी करत जिवंत असल्याचे सांगत पाकिस्तानी लष्कराला धडा शिकवणार अशी धमकी दिली होती.
Web Summary : TTP claims a major attack in South Waziristan, killing 25 Pakistani soldiers and capturing a military base. Pakistan hasn't confirmed the claim. Tensions escalate amid threats and accusations between Pakistan and Afghanistan regarding TTP.
Web Summary : टीटीपी ने दक्षिण वज़ीरिस्तान में एक बड़े हमले का दावा किया, जिसमें 25 पाकिस्तानी सैनिक मारे गए और एक सैन्य अड्डे पर कब्जा कर लिया गया। पाकिस्तान ने अभी तक दावे की पुष्टि नहीं की है। टीटीपी को लेकर पाकिस्तान और अफगानिस्तान के बीच तनाव बढ़ गया है।