दक्षिण कोरियात मोठा अपघात, विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले, २८ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 08:31 IST2024-12-29T08:30:39+5:302024-12-29T08:31:54+5:30
काही दिवसापूर्वी अझरबैजानचे एक विमान लँडिंगदरम्यान कोसळले. रविवारी दक्षिण कोरियात असाच एक हवाई अपघात झाला. या घटनेत २८ जणांचा मृ्त्यू झाला.

दक्षिण कोरियात मोठा अपघात, विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले, २८ ठार
दक्षिण कोरियामध्ये रविवारी एक मोठा विमानअपघात झाला. दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरले. या अपघातात २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू असून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बांगलादेश सरकार चिन्मय दास यांना सोडू इच्छित नाही, वकिलांनी केला मोठा दावा
हे विमान थायलंडहून परतत असल्याचं सांगण्यात येत आहे. विमान दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरत होते. यादरम्यान ते धावपट्टीवर घसरले आणि भिंतीवर आदळले. त्यामुळे विमानाला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, २८ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरलाइन्सचे फ्लाइट 2216 थायलंडहून परतत होते. आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. विमानाच्या मागील भागातून प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. विमानात एकूण १८१ प्रवासी होते. यापैकी १७५ प्रवासी आणि सहा विमान चालक दलाचे सदस्य होते.
अपघातस्थळावर धुराचे लोट दिसत आहे. लँडिंगच्या वेळी पक्षाची धडक झाली यावेळी गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला असावा, असाही अंदाज आहे. राष्ट्रीय अग्निशमन यंत्रणेने सांगितले की, अपघातानंतर लागलेली आग जवळपास आटोक्यात आणण्यात आली आहे.
बड़ा हादसा
— Abhishek Anand (@TweetAbhishekA) December 29, 2024
बैंकॉक से 175 यात्रियों को ले जा रहा विमान क्रैश होकर आग के गोले में बदला,
ज्यादातर यात्रियों की मौत की आशंका,
47 लोगों की मौत की पुष्टि, रेस्क्यू अभी भी चल रहा,
साउथ कोरिया के रनवे पर क्रैश हुआ Jeju Air flight 7C2216,
4 दिन में दूसरा बड़ा विमान हादसा pic.twitter.com/vyuaIzEkBh