मोठा अपघात, वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, ३४ जण गंभीर जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:00 IST2026-02-06T14:00:06+5:302026-02-06T14:00:25+5:30

Nepal Bus Accident: लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जात असलेली बस खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उत्तराखंडमधील पिथौरागडपासून जवळच असलेल्या नेपाळमधील बैतडी जिल्ह्यात झाला.

Major accident in Nepal, bus carrying wedding guests falls into deep gorge, 13 killed | मोठा अपघात, वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, ३४ जण गंभीर जखमी  

मोठा अपघात, वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, ३४ जण गंभीर जखमी  

लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जात असलेली बस खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उत्तराखंडमधील पिथौरागडपासून जवळच असलेल्या नेपाळमधील बैतडी जिल्ह्यात झाला. वऱ्हाड्यांनी भरलेली बस नियंत्रण सुटून सुमारे २०० मीटर खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचं वृत्त समजल्यानंतर नेपाळमधील प्रशासन आणि स्थानिकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींनी बैतडी आणि डडेलधुरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार हा अपघात नेपाळमधील पश्चिम भागात असलेल्या बैतडी जिल्ह्यात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर आणखी पाच जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या वाढून १३ एवढी झाली.

ही बस चढण असलेल्या रस्त्यावरून जात असताना प्रवाशांचा अधिक भार असल्याने प्रेशर पाईप तुटला आणि हा अपघात झाला, असा अंदाज बचाव पथकांनी वर्तवला आहे. मात्र अपघाताचं खरं कारण शोधण्यासाठी अधिक तपास केला जात आहे.  

Web Title : नेपाल में बस खाई में गिरी; 13 की मौत, 34 घायल

Web Summary : नेपाल के बैतडी जिले में पिथौरागढ़ के पास शादी के मेहमानों को ले जा रही एक बस गहरी खाई में गिर गई, जिससे 13 लोगों की मौत हो गई और 34 गंभीर रूप से घायल हो गए। बताया जा रहा है कि अधिक भार और ढलान के कारण बस का प्रेशर पाइप फट गया। बचाव कार्य जारी है; घायलों को अस्पताल में भर्ती कराया गया है।

Web Title : Bus plunges into valley in Nepal; 13 dead, 34 injured.

Web Summary : A bus carrying wedding guests crashed into a deep valley in Nepal's Baitadi district, near Pithoragarh, killing 13 and seriously injuring 34. The bus, overloaded and on an incline, reportedly suffered a pressure pipe failure. Rescue operations are underway; injured are hospitalized.