Narendra Modi-Donald Trump Meeting Live: २०३० पर्यंत अमेरिका-भारत व्यापार दुप्पट करणार - मोदी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 05:26 IST2025-02-14T02:38:18+5:302025-02-14T05:26:31+5:30

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत.

Live update of Indian PM Narendra Modi is visiting US for Meeting with America President Donald Trump, US India News Live update in Marathi | Narendra Modi-Donald Trump Meeting Live: २०३० पर्यंत अमेरिका-भारत व्यापार दुप्पट करणार - मोदी

Narendra Modi-Donald Trump Meeting Live: २०३० पर्यंत अमेरिका-भारत व्यापार दुप्पट करणार - मोदी

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. याठिकाणी मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत आहेत. या भेटीत भारत-अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी ट्रम्प यांची ही पहिलीच भेट आहे. 
 
LIVE

Get Latest Updates

14 Feb, 25 : 07:29 AM

दहशतवादविरोधी लढ्यात भारत-अमेरिका एकत्र उभे राहू

भारत आणि अमेरिकेची भागीदारी ही लोकशाही आणि त्याची मूल्ये, व्यवस्था सशक्त बनवते. आम्ही इंडो पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी मिळून काम करू. त्यात क्वाडची विशेष भूमिका असेल. भारतात होणाऱ्या क्वाड समिटमध्ये आम्ही पार्टनर देशांसोबत सहकार्य आणखी वाढवणार आहोत. इकोनॉमी कोरिडोर उभारू. दहशतवाद विरोधी लढ्यात भारत आणि अमेरिका एकत्र उभे राहू. सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांवर ठोस कारवाई व्हायला हवी. २००८ मध्ये भारतात नरसंहार केला त्या गुन्हेगाराला सोपवण्यासाठी मी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानतो. भारतातील न्यायालये त्याच्यावर कारवाई करतील - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

14 Feb, 25 : 05:32 AM

14 Feb, 25 : 05:25 AM

"भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय"

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध मजबूत केले आहे. ज्यारितीने आम्ही पहिल्या टर्ममध्ये काम केले तीच ऊर्जा, तोच उत्साह आज मला दिसून आला. नवीन लक्ष्य प्राप्त करण्याचा आम्ही संकल्प केल आहे. भारत आणि अमेरिका यांचं एकत्र येणे आणि सहकार्य करणे हे चांगल्या जगाला सुरक्षित करू शकतो. भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. जेव्हा अमेरिका आणि भारत एकत्र काम करतो तेव्हा मेगा पार्टनरशिप बनते. आज आम्ही द्विपक्षीय चर्चेतून २०३० पर्यंत अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार दुप्पटीने वाढवून ५ बिलियन डॉलर करण्याचा निर्धार केला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

14 Feb, 25 : 04:27 AM

नजीकच्या काळात भारतासोबत अनेक व्यापारी करार होतील - ट्रम्प

युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या तुमच्या योजनेत भारताची भूमिका आहे का असा प्रश्न पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारला असता ते म्हणाले की, आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही सर्व देशांशी चांगले संबंध ठेवणार आहोत. खूप चांगले काम करणार आहोत. आम्ही भारतासोबतही काम करणार आहोत. नजीकच्या काळात अनेक मोठे व्यापारी करार जाहीर होणार आहेत असं त्यांनी म्हटलं. 

14 Feb, 25 : 04:26 AM

पुढील ४ दुप्पट वेगाने काम करू, नरेंद्र मोदींचं आश्वासन

व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करताच माझ्या मित्राने मला अहमदाबादमध्ये आम्ही आयोजित केलेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाची आठवण करून दिली. आजही तो कार्यक्रम अनेकांच्या आठवणीत आहे. आमचे संबंध व्यापक बनवण्यासाठी आणि नवी उंची गाठण्यासाठी तुम्ही दिलेले योगदान खूप आहे. तुमच्या दुसऱ्या कार्यकाळातही आपण आणखी वेगाने काम करू. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पटीने काम करेन असं भारतातील लोकांना वचन दिले आहे. तसेच मला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पुढील ४ वर्षात पहिल्यापेक्षा दुप्पट वेगाने काम करू अशी खात्री आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

14 Feb, 25 : 04:09 AM

14 Feb, 25 : 03:42 AM

मोदी महान नेते, ते मोठं काम करतायेत - ट्रम्प

मोदी महान नेते, ते मोठं काम करत आहेत. भारत आणि अमेरिका एकत्र येणं गरजेचे. मी आणि मोदी मित्र आहोत आणि यापुढेही राहू- डोनाल्ड ट्रम्प

14 Feb, 25 : 03:41 AM

विकसित भारताच्या संकल्पाला नवी गती मिळतेय - मोदी

पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये येऊन मला आनंद होत आहे. मी माझ्यासह १४० कोटी भारतीयांकडून ट्रम्प यांचं अभिनंदन करतो. मागील वर्षी मला भारतातील जनतेने तिसऱ्यांदा सत्ता सोपवून सेवा करण्याची संधी दिली. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत मिळून पुढील ४ वर्ष दुप्पट वेगाने काम करू. विकसित भारताच्या संकल्पाला नवी गती मिळत आहे. आमच्या एकत्र येण्याचा अर्थ 'एक और एक ग्यारह' आहे - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

14 Feb, 25 : 03:34 AM

"भारत-अमेरिका यांच्यातील संबंध वेगाने पुढे नेणार"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचं समस्त भारतीयांकडून केले अभिनंदन, भारत आणि अमेरिका यांच्यातील नाते मजबूत करणार आहोत. आजच्या या भेटीने 'नमस्ते ट्रम्प' या भारतातील कार्यक्रमाची आठवण झाली. येणाऱ्या ४ वर्षात आम्ही भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध वेगाने पुढे नेणार आहे - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

14 Feb, 25 : 03:30 AM

ट्रम्प आणि मोदी यांच्यात गळाभेट, व्हाईट हाऊसमध्ये केले स्वागत

भारत अमेरिका द्विपक्षीय चर्चेसाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहचताच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींची गळाभेट स्वागत केले. 

14 Feb, 25 : 03:17 AM

व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा

14 Feb, 25 : 03:06 AM

पंतप्रधान मोदींनंतर भारतीय शिष्टमंडळही व्हाईट हाऊसमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हाईट हाऊसमध्ये आगमन झाल्यानंतर लगेचच परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यासह भारतीय शिष्टमंडळ व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले.

14 Feb, 25 : 03:02 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये दाखल

14 Feb, 25 : 02:46 AM

भारत सर्वात जास्त कर आकारणारा देश - ट्रम्प

भारत इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कर आकारणारा देश आहे. ते आमच्याकडून जे शुल्क आकारतील तितकेच आम्हीही त्यांना कर लावू  - डोनाल्ड ट्रम्प  

14 Feb, 25 : 02:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी व्हाईट हाऊस सज्ज

दुसऱ्यांदा अमेरिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा भेट घेत आहे. मोदी २ दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी भारत-अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत ब्लेयर हाऊस येथे मुक्कामाला होते. ब्लेयर हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे गेस्ट हाऊस आहे.

14 Feb, 25 : 02:41 AM

डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी

जर ब्रिक्स देश डॉलरशी खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्यावर १०० टक्के टॅरिफ लावू. ब्रिक्स सध्या मृतावस्थेत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं. 

Web Title: Live update of Indian PM Narendra Modi is visiting US for Meeting with America President Donald Trump, US India News Live update in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.