शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जॉर्जियाच्या राजधानीत ‘लाइव्ह’ जुमानजी!

By admin | Updated: June 15, 2015 05:18 IST

पूर्वीच्या सोवियत संघातून फुटून आता स्वतंत्र देश असलेल्या जॉर्जियाच्या तिबिलिसी या राजधानीत रविवारी साक्षात ‘जुमानजी’ चित्रपटासारखी स्थिती

तिबिलिसी (जॉर्जिया) : पूर्वीच्या सोवियत संघातून फुटून आता स्वतंत्र देश असलेल्या जॉर्जियाच्या तिबिलिसी या राजधानीत रविवारी साक्षात ‘जुमानजी’ चित्रपटासारखी स्थिती आल्याने आधीच पुराने त्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली होती. पुराचे पाणी शिरल्यानंतर येथील प्राणिसंग्रहालयातून शहरभर पळालेल्या जंगली श्वापदांना पुन्हा पकडण्याची अथवा ते शक्य नसेल तर ठार मारण्याची पोलीस आणि लष्करी सैनिकांची दिवसभर शिकस्त सुरू होती.तिबिलिसी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवक्त्या मझिया शाराशित्झे यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयातून सुटून पळालेल्या २० कोल्ह्यांना, ८ सिंहांना, पांढऱ्या वाघांना, पट्टेदार वाघांना, लांडग्यांना आणि चित्त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी दिवसभरात एकतर ठार तरी मारले आहे किंवा हे प्राणी अद्यापही ‘बेपत्ता’ आहेत. एकूण १७पैकी फक्त ३ पेंग्विनना पुरातून वाचविता आले, असेही त्यांनी सांगितले. शाराशित्झे यांनी इंटरप्रेस वृत्तसंस्थेला असेही सांगितले की, पुराने वेढलेल्या प्राणिसंग्रहलयाच्या जागेतून ३ मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी २ मृतदेह प्राणिसंग्रहलायाच्या कर्मचाऱ्यांचे आहेत. एकीकडे पोलीस व सुरक्षा दलाचे जवान मोकाट सुटलेल्या हिंस्र श्वापदांना आवर घालण्याचा आटापिटा करीत असताना दुसरीकडे पुरात अडकलेल्या असंख्य लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात येत होते. तिबिलिसी शहर व्हेरे नदीकाठी वसलेले आहे. अनेक तासांच्या मुसळधार पावसाने नदीच्या पुराचे पाणी शहरभर भरले. परिणामी, शहराच्या मुख्य चौकांना व रस्त्यांना जणू दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्याचे स्वरूप आले आहे. पुरात आत्तापर्यंत ८ नागरिक मृत्युमुखी पडले असून, अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते निनो जॉर्जो बिआनी यांनी सांगितले. मोकाट सुटलेले सर्व प्राणी पुन्हा पकडले जाईपर्यंत रहिवाशांनी घरातच राहावे, असे आवाहन पंतप्रधान इरार्की गॅरिबॅशिविली यांनी केले. (वृत्तसंस्था)