शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

लिबिया हादरले! गद्दाफीच्या मुलाला घरात घुसून मारले; ४ बंदूकधाऱ्यांनी शरीराची चाळण केली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:34 IST

Saif al-Islam Gaddafi Death: लिबियाचा नेता सैफ अल-इस्लाम गद्दाफी याची झिंटन येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. वाचा या हत्येमागील संपूर्ण घटना आणि लिबियातील सध्याची स्थिती.

लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी याचा मुलगा आणि एकेकाळचा त्यांचा उत्तराधिकारी सैफ अल-इस्लाम गडाफी याची मंगळवारी हत्या करण्यात आली. लिबियातील झिंटन येथील त्याच्या राहत्या घरी चार अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सैफ अल-इस्लामचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी केले. त्यानंतर 'कमांडो स्टाईल'ने घरात प्रवेश करून त्यांनी सैफ अल-इस्लामवर थेट गोळीबार केला. हल्ल्यानंतर हे बंदूकधारी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची पुष्टी सैफच्या राजकीय कार्यालयाने आणि त्यांच्या वकिलांनी केली आहे. मात्र, या हत्येमागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोण होता सैफ अल-इस्लाम गद्दाफी? ५३ वर्षीय सैफ हा मुअम्मर गद्दाफी यांचा दुसरा मुलगा होता. २०११ च्या क्रांतीनंतर तो लिबियातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक मानला जात असे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलेला सैफ हा पाश्चात्य देशांशी जवळीक असलेला नेता म्हणून ओळखला जायचा. २०११ मध्ये त्याच्या वडिलांच्या हत्येनंतर तो अनेक वर्षे विजनवासात होता. २०१५ मध्ये त्याला त्रिपोलीच्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती, पण नंतर त्याची सुटका झाली होती.

लिबियाच्या राजकारणात खळबळ २०२१ मध्ये त्याने लिबियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे लिबियातील राजकीय समीकरणे बदलली होती. त्याच्या हत्येमुळे लिबियातील शांतता प्रक्रियेवर आणि आगामी निवडणुकांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लिबियाच्या अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोषींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Libya Shaken: Gaddafi's Son Killed in Home Attack

Web Summary : Muammar Gaddafi's son, Saif al-Islam, was killed in Libya. Four gunmen stormed his home in Zintan and fatally shot him. Saif, once a powerful figure, had announced his presidential candidacy in 2021. The killing raises questions about Libya's peace process and upcoming elections.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी