अफगाणिस्तानमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:36 IST2018-11-26T15:31:51+5:302018-11-26T15:36:37+5:30
अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील भागात पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात 20 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

अफगाणिस्तानमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू
काबूल : अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील भागात पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात 20 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
प्रांतीय परिषदेचे सदस्य दादुल्लाह कानेह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील फराह प्रांतात रविवारी दुपारी तालिबान या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, चार पोलीस जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी हा हल्ला लश वा जुवायन जिल्ह्याजवळ केला.
परिषदेचे आणखी एक सदस्य समद सलेही यांनी सांगितले की, पोलिसांचा ताफा नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांची ओळख करुन देण्यासाठी जात होता. त्यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, तालिबान या दहशतवादी संघटनेने पोलिसांवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दुसरीकडे काबूलमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यक शिया समुदायाच्या प्रमुखाला अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.