'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:23 IST2025-12-31T16:20:59+5:302025-12-31T16:23:14+5:30
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा पुन्हा एकदा भारताविरोधी भडकाऊ प्रचार सुरू केला आहे.

'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
Saifullah Kasuri on Operation Sindoor: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा पुन्हा एकदा भारताविरोधी भडकाऊ प्रचार सुरू केला आहे. संघटनेचा संस्थापक हाफिज सईद आणि त्याचा निकटवर्तीय सैफुल्ला कसुरी यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूर बाबत पुन्हा चिथावणीखोर विधाने केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओतील कथित वक्तव्य
व्हिडिओमध्ये सैफुल्ला कसुरी असा दावा करतो की, दीड महिन्यापूर्वी तो एका ‘मजलिस’ (बैठक) मध्ये सहभागी झाला होता, जिथे हाफिज सईदही उपस्थित होता. त्या बैठकीत भारताकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारला असता, हाफिज सईदने भारताच्या धमक्या “पोकळ” असल्याचे म्हटले. कसुरीच्या म्हणण्यानुसार, हाफिज सईद असेही म्हणाला की, भारताला सहा महिन्यांपूर्वी असा मोठा धक्का बसला आहे की, तो पुढील 50 वर्षे लष्कर-ए-तैयबावर हल्ला करण्याची हिंमत करणार नाही.
🚨 INTEL REPORT | BREAKING
— INDIAN (@hindus47) December 31, 2025
Saifullah Kasuri, Pahalgam mastermind & LeT Deputy Chief, has reportedly revealed details of a closed-door Majlis with Hafiz Saeed.
During the meeting, a senior operative raised concerns over India’s daily threats against Pakistan.
Hafiz Saeed’s… pic.twitter.com/nrpCcdRoM8
ऑपरेशन सिंदूरनंतरची रणनीती
सैफुल्ला कसुरीने असा दावाही केला की, ऑपरेशन सिंदूरनंतर लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरांनी पाकिस्तानमध्ये बैठक घेऊन पुढील रणनीती आखली आहे. त्याच्या मते, भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून मोठी चूक केली आहे. कसुरीने आंतरराष्ट्रीय समुदायालाही संदेश देत, लष्कर-ए-तैयबा माघार घेणार नसल्याचे म्हटले.
काश्मीर व इतर भागांबाबत चिथावणीखोर दावे
कसुरीने आपल्या वक्तव्यात आणखी वादग्रस्त दावा केला. त्याने म्हटले की, भारताने काश्मीरसह अमृतसर, होशियारपूर, गुरदासपूर, जुनागढ, मुनावदर, हैदराबाद, दख्खन आणि बंगालसारख्या मुस्लिमबहुल भागांवर बेकायदेशीर कब्जा केला असून हे भाग पाकिस्तानचे आहेत.
पाकिस्तानच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
पाकिस्तान सरकारकडून सातत्याने असा दावा केला जातो की, हाफिज सईद तुरुंगात आहे. मात्र, या व्हिडिओमुळे त्या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण व्हिडिओत लष्करचा प्रमुख मोकळेपणाने बैठकांमध्ये सहभागी असल्याचे चित्र समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे, संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे, तसेच त्याच्यावर निर्बंधही लागू आहेत.