स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 10:55 IST2025-05-19T10:46:36+5:302025-05-19T10:55:28+5:30
Balochistan : पाकिस्तानचा हा सर्वांत मोठा प्रांत जर वेगळा झाला तर नवा देश म्हणून त्याचे स्वरूप कसे असेल, त्याचा नकाशा कसा असेल, अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...

स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत आहे. पाकिस्तानचा हा सर्वांत मोठा प्रांत जर वेगळा झाला तर नवा देश म्हणून त्याचे स्वरूप कसे असेल, त्याचा नकाशा कसा असेल, अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...
पाकिस्तानवर काय परिणाम होणार?
पाकिस्तानच्या एकूण नैसर्गिक वायू आणि खनिजाचे ४० ते ५० टक्के साठे एकट्या बलुचिस्तान प्रांतात आहेत. पाकिस्तानची २० ते ३० टक्के अर्थव्यवस्था यावर अवलंबून आहे. बलुचिस्तान वेगळे झाले तर पाकच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसेल. याशिवाय ‘चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ आणि ‘वन बेल्ट वन रोड’ योजना अडचणीत आल्यामुळे पाकला अब्जावधी रुपयांचे नुकसान होईल. चीनच्या महत्त्वाकांक्षानाही धक्का बसेल.
ताकद : खनिज संपत्तीने समृद्ध, सोने, कोळसा विपुल
४० ते ५० प्रकारचे खनिज भांडार
२० ट्रिलियन क्युबिक फीट
नैसर्गिक वायू
५.९ बिलियन टन खनिज
२ टक्के तांबे
३५० टन सोने
२०० मिलियन टन कोळसा
२०० मिलियन लोह खनिज
क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय?
बलुचिस्तानचे क्षेत्रफळ ३,४७,१९० वर्ग किमी आहे. यात अरबी समुद्रालगत ७०० किलोमीटर लांब किनारपट्टीचा समावेश आहे. ही किनारपट्टी इराण आणि अफगाणिस्तानला जोडते.
भारतासाठी काय? : बलुचिस्तानचे स्वतंत्र होणे म्हणजे भारतासाठी सामरिक स्थिती मजबूत होणे. यामुळे चीनचा प्रभाव कमी होईल. पाकिस्तानची लुडबुड नसल्यामुळे दहशतवादी अड्डे बंद होतील. बलुचिस्तानची खनिज संपत्ती आणि बंदरे यांचा भारताला मोठा उपयोग होऊ शकतो.
का वेगळे होऊ इच्छितात बलुच? : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देऊनही बलुच नागरिकांना त्याचा फायदा मिळत नाही.
तांबे आणि सोन्याचे भांडार
बलुचिस्तानच्या रेको डिक खदानीत तांबा, सोने तसेच सुई गॅस फिल्ड येथे नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचप्रमाणे ४० ते ५० इतर खनिजेही या परिसरात आहेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा हा कणा समजला जातो.
कसे असेल बलुचिस्तान?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने बलुचिस्तान जगातील ६५ वा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने १७८ वा देश असेल. जर्मनी, मलेशिया, इटली, ओमान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, न्यूझीलंडसारख्या देशांपेक्षाही बलुचिस्तान मोठा असेल.