knife attack in tokyos kawasaki city children stabbed 2 dead 17 injured | Japan Attack: जपानमध्ये माथेफिरूचा जमावावर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, 17 जण जखमी
Japan Attack: जपानमध्ये माथेफिरूचा जमावावर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, 17 जण जखमी

ठळक मुद्देजपानमध्ये एका माथेफिरू तरुणाने जमावावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. जपानमधील कावासाकी शहरातील एका पार्कच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला आहे.

टोकीयो - जपानमध्ये एका माथेफिरू तरुणाने जमावावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकळी जवळपास 20 लोकांवर या तरुणाने चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टोकीयोतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानमधील कावासाकी शहरातील एका पार्कच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. एका माथेफिरू तरूणाने जवळपास 20 लोकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात 19 जण जखमी झाले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोराकडून दोन चाकू जप्त करण्यात आले आहेत. हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक केली तेव्हा त्याने हातातील चाकून स्वत: वरच वार करून स्वत: ला जखमी करून घेतलं.  कावासाकी अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्यांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक इमर्जन्सी कॉल आला. त्यामध्ये एका व्यक्तीने बस स्टॉपजवळ पोहोचताच उपस्थित लोकांवर चाकूने वार केले असल्याची माहिती देण्यात आली. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या काही व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. 


 

English summary :
Japan attack: In Japan, a shocking incident has occurred that a psyco person attacked on around 20 people with a knife. Two people were killed and 17 others injured in the attack.


Web Title: knife attack in tokyos kawasaki city children stabbed 2 dead 17 injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.