शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 12:26 IST

Kim Jong Un गेल्या मे महिन्यापासून किम जोंग उन गायब आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातम्या बाहेर पडू लागल्या होत्या. मात्र, त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे सरकारने सांगितले होते. यावर आता चांग यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे खळबळजनक दावा केला आहे.

उत्तर कोरिय़ाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un  in Coma) कोमामध्ये गेला आहे. त्याची बहीण किम यो जोंग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जबाबदारी सांभाळण्याचे प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक दावा उत्तर कोरियांचे दिवंगत नेते आणि माजी सहकारी चांग सॉन्ग मिन यांनी केला आहे.

गेल्या मे महिन्यापासून किम जोंग उन गायब आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातम्या बाहेर पडू लागल्या होत्या. मात्र, त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे सरकारने सांगितले होते. यावर आता चांग यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे खळबळजनक दावा केला आहे. उत्तर कोरियाचा (North korea) कोणताही नेता कधीच आपली सत्ता दुसऱ्याला देत नाही. जेव्हा त्या नेत्याला गंभीर आजार होते किंवा तख्तापालट होते तेव्हाच त्याची सत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्याकडे हस्तांतरीत केली जाते, असे चांग यांनी म्हटले आहे. 

चांग सॉन्ग मिन यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्या मतानुसार किम जोंग उन कोमात गेला आहे, मात्र. त्याचा मृत्यू झालेला नाहीय. उत्तर कोरियामध्ये एका पूर्ण उत्तराधिकारी संघटनेची निर्मिती झालेली नाही. यामुळे किम यो जोंगला (kim yo jong) पुढे आणले जात आहे. कारण देशाचे हे मोठे पद जास्त काळासाठी रिकामे ठेवता येणार नाही. 

किम यांच्या प्रकृतीच्या वृत्तांनंतर चीनने तज्ज्ञ डॉक्टांरांचे पथक उत्तर कोरियाला पाठविले होते. चांग यांनी या पथकातील सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, किम बेशुद्ध आणि निष्क्रिय आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तहेरांनुसार एका बंद खोलीत किमच्या कायदातज्ज्ञांनी किमच्या एका खास सहकाऱ्याला सगळे अधिकार आणि जबाबदारी देऊन टाकली आहे. तसेच किम एका खतांच्या फॅक्टरीची फित कापतानाचे फोटो बनावट असल्याचे चांग यांनी म्हटले आहेत. 

दोन दिवसांपूर्वीच दिली जबाबदारीदक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने सांगितले की, 32 वर्षांची किम यो जोंग हिला अमेरिका आणि दक्षिण कोरियाशी संबंधित प्रकरणांवर लक्ष घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी तिला उत्तर कोरियाचा प्रभारी बनविण्यात आले आहे. यावर उत्तर कोरियाने दावा केला आहे की, किम जोंग उन यांच्या सरकारवरील तणाव कमी करण्यासाठी त्यांनी काही अधिकार बहिणीला दिले आहेत. उन यांचाच उत्तर कोरियावर पूर्ण अधिकार असून यो जोंग या केवळ काही देशांसाठीच महत्वाच्या आहेत. किम यो जोंग यांना अशावेळी ही जबाबदारी देण्यात आली आहे, जेव्हा किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या होत्या. जवळपास 21 दिवस उन गायब होते. त्यानंतर उत्तर कोरियाने त्यांचा एक व्हिडीओ जारी करत ते एकदम ठीक असल्याचा दावा केला होता. मात्र, आज तीन ते चार महिने उलटूनही किम कुठल्याही समारंभात किंवा सरकारी बैठकांना दिसलेले नाहीत. किम यांना पत्नी री सोल जू हिच्यापासून तीन मुले आहेत. ही मुले कधीही सार्वजनिक स्वरुपात बाहेर आलेली नाहीत. त्यांना कोणीच पाहिलेले नाहीय. 10, 7 आणि तीन वर्षांची ही मुले आहेत. उत्तर कोरियाची जबाबदारी स्वीकारण्यास ते असमर्थ आहेत. यामुळे किम यांची बहीणच उत्तराधिकारी बनणार आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी

युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा

लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करावा लागणार

धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया