कराचीत हाहाकार! गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; १६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:14 IST2026-02-19T17:10:28+5:302026-02-19T17:14:42+5:30

सोल्जर बाजार परिसरात असलेल्या एका तीन मजली इमारतीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, संपूर्ण इमारत क्षणात जमीनदोस्त झाली.

Karachi: Massive gas cylinder explosion causes 3-storey building to collapse; 16 dead | कराचीत हाहाकार! गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; १६ जणांचा मृत्यू

कराचीत हाहाकार! गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात ३ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; १६ जणांचा मृत्यू

पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात बुधवारी रात्री उशिरा एका भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. सोल्जर बाजार परिसरात असलेल्या एका तीन मजली इमारतीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, संपूर्ण इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ बालके आणि ६ महिलांसह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मध्यरात्री कोसळला मृत्यूचा डोंगर

मिळालेल्या माहितीनुसार, सोल्जर बाजार नंबर ३ मधील या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बुधवारी रात्री उशिरा गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासचा परिसर हादरून गेला. गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि अवघी इमारत ढिगाऱ्यात रूपांतरित झाली. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १० वर्षांच्या चिमुरडीपासून ६० वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकांचा समावेश आहे.

बचावकार्यात अडथळ्यांची शर्यत

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मदत कार्य पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, या इमारतीत अत्यंत लहान खोल्या असल्याने आणि जागा अरुंद असल्याने ढिगारा हटवताना प्रशासनाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरचे डॉ. मोहम्मद सबीर मेमन यांनी सांगितले की, जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ढिगाऱ्याखालून एका १४ वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

इमारतीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह?

डीआयजी डॉ. फारुख लानजार यांनी प्राथमिक माहितीच्या आधारे सांगितले की, गॅस गळतीमुळेच हा स्फोट झाला असावा. मात्र, स्फोटाची तीव्रता पाहता इतर शक्यतांचीही तपासणी केली जात आहे. "आम्ही या इमारतीच्या बांधकामाची चौकशी करत आहोत. ही इमारत अधिकृत होती की बेकायदेशीर, याची तपासणी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title : कराची में गैस सिलेंडर विस्फोट: इमारत ढही, कई मृत!

Web Summary : कराची में गैस सिलेंडर विस्फोट से तीन मंजिला इमारत ढह गई, जिसमें बच्चों और महिलाओं समेत सोलह लोगों की मौत हो गई। चौदह गंभीर रूप से घायल हैं। बचाव प्रयासों के बीच इमारत की वैधता की जांच की जा रही है।

Web Title : Karachi Gas Cylinder Blast: Building Collapses, Many Dead, Havoc!

Web Summary : A gas cylinder explosion in Karachi collapsed a three-story building, killing sixteen, including children and women. Fourteen are critically injured. The building's legality is under investigation amidst rescue efforts.