"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:28 IST2025-06-22T12:27:25+5:302025-06-22T12:28:19+5:30

भारतातील इराणी दूतावासाने हे निवेदन प्रसिद्ध केले, यात, अमेरिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे...

Jungle Ka Kanun After the America attack on nuclear sites Iran's message to the US through India, took a big oath | "जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!

"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!

अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर मोठे हल्ले करत ते उद्ध्वस्त केली आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सच्या सहाय्याने इराणच्या अणुकेंद्रांवर सुमारे १३ हजार किलो वजनाचे GBU-५७ बॉम्ब टाकल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर, इराणच्या अणुऊर्जा संघटनेने (AEOI) एक भावनिक आणि रोखठोक निवेदन जारी केले आहे. भारतातील इराणी दूतावासाने हे निवेदन प्रसिद्ध केले, यात, अमेरिकेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे आणि पुन्हा एकदा अणुकार्यक्रम सुरू करण्याची शपथ घेण्यात आली आहे.

इराणकडून अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध - 
भारतातील इराणी दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या या निवेदनात म्हणण्यात  आले आहे की, "गेल्या काही दिवसांत झिओनिस्ट शत्रूने केलेल्या क्रूर हल्ल्यांनंतर, आज सकाळी देशाच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील अणुकेंद्रांवर क्रूर हल्ला करण्यात आला. हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे, विशेषतः एनपीटीचे उल्लंघन आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारे ही कारवाई दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) उदासीनतेमुळे, नव्हे, त्यांच्या संगनमताने घडली आहे." 

यात पुढे म्हणण्यात आले आहे, "अमेरिकन शत्रूने, व्हर्चूअल सॅटेलाइट फोटोच्या माध्यमाने आणि आपल्या राष्ट्रपतीच्या आदेशाने संबंधित ठिकाणांवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जी सुरक्षा करार आणि एनपीटीनुसार सातत्याने IAEA च्या देखरेखीत आहे. आशा आहे की, अंतरराष्ट्रीय समाज "जंगली नियमां" मुळे, निर्माण झालेल्या या अराजकतेचा निषेध करेल आणि इराणला त्याचा वैध अधिकारांचा दावा करण्यात समर्थन देईल."



असं होतं अमेरिका-इस्रायलचं प्लॅनिंग -
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला पूर्णपणे साथ दिली. या मोहिमेसाठी व्यवस्थित समन्वय ठेवण्यात आला होता. इराणवर हल्ला करण्यापूर्वी लढाऊ विमाने गुआम या तळावर आणली गेलेली होती. तसेच, अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या बंकर बस्टर्स बॉम्बमुळे इराणच्या अणुऊर्जा केंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे. 
 

Web Title: Jungle Ka Kanun After the America attack on nuclear sites Iran's message to the US through India, took a big oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.