शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

जून महिना लांबणार एक सेकंदाने!

By admin | Updated: June 3, 2015 03:50 IST

तुमचा वाढदिवस ३० जूनला असेल तर यंदा तुम्हाला तो साजरा करण्यासाठी एक सेकंद जास्तीचे मिळणार आहे! लीप वर्षाचे गणित पूर्ण करण्यासाठी

लंडन : तुमचा वाढदिवस ३० जूनला असेल तर यंदा तुम्हाला तो साजरा करण्यासाठी एक सेकंद जास्तीचे मिळणार आहे!लीप वर्षाचे गणित पूर्ण करण्यासाठी यंदाच्या जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी जास्तीचा एक सेकंद वाढविण्यात येणार असल्याचे जगभरातील घड्याळी वेळेचे अचूक नियंत्रण करणाऱ्या पॅरिस येथील वेधशाळेने जाहीर केले आहे. आण्विक कालगणनेची गती निरंतर स्थिर असते. पण पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची परिवलन गती मात्र दररोज एका सेकंदाच्या दोन हजाराव्या भागाइतक्या गतीने मंदावत चालली आहे. या दोन्हींमध्ये मेळ साधण्यासाठी यंदाच्या घड्याळी वेळेत हे एक जास्त सेकंद धरण्यात येणार आहे. फ्रान्समधील ‘इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस’ या वेधशाळेतील वैज्ञानिक पृथ्वीच्या परिवलन गतीवर सतत लक्ष ठेवून असतात व त्यात होणाऱ्या बदलानुसार घड्याळी वेळेची जुळणी करीत असतात.यामुळे येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी जगभरातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे. अशाच प्रकारे याआधी सन २०१२मध्ये घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविले गेले तेव्हा अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती व खासकरून जावा स्क्रीप्टमधील सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे वृत्त ‘दि टेलिग्राफ’ दैनिकाने दिले आहे. अशा प्रकारे घड्याळी वेळेमध्ये एक जास्तीचे सेकंद सर्वप्रथम १९७२मध्ये वाढविले गेले होते. त्यानंतर अशा प्रकारे सेकंद वाढविले जाण्याची ही २६वी वेळ आहे. यामुळे ३० जून रोजी घड्याळांमध्ये ११:५९:५९ वाजल्यानंतर दुपारचे १२ न वाजता घड्याळे ११:५९:६० अशी वेळ दाखवतील. (वृत्तसंस्था)