शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Journalist Danish Siddiqui : दानिश सिद्दीकीच्या मृत्युनंतर तालिबानचं स्पष्टीकरण, इतर पत्रकारांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 14:28 IST

Journalist Danish Siddiqui : अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देतालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद ने सीएनएन-न्यूज18 शी बोलताना म्हटले की, गोळीबाराच्या चकमकीत पत्रकार दानिश यांना कोणाची गोळी लागली, कशी लागली याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. दानिश यांच्या मृत्युचा आम्हाला खेद वाटतो, असेही मुजाहिद यांनी म्हटले आहे.

प्रतिष्ठित समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार विजेता भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे वृत्तांकन करताना चकमकीत हत्या झाली आहे. दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते. माध्यमांमध्ये वृत्त झळकताच या घटनेचा निषेध व्यक्त झाल्यानंतर तालिबानने आता स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, दानिशच्या मृत्युबद्दल खेदही व्यक्त केला आहे.  

अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. दानिश सिद्दीक हे 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदावर कार्यरत होते. भारतात कोरोना या महारोगाची साथ पसरली असताना त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून कोरोना संकटाची दाहकता जगासमोर आली होती. दुर्दैवाने तालिबानच्या हल्ल्यात दानिश यांचा मृत्यू झाला. याबाबत, तालिबानने स्पष्टीकरण देत खेद व्यक्त केला आहे.

तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद ने सीएनएन-न्यूज18 शी बोलताना म्हटले की, गोळीबाराच्या चकमकीत पत्रकार दानिश यांना कोणाची गोळी लागली, कशी लागली याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. दानिश यांच्या मृत्युचा आम्हाला खेद वाटतो, असेही मुजाहिद यांनी म्हटले आहे. तसेच, तालिबानमध्ये कव्हरेजसाठी येणाऱ्या इतर पत्रकारांना सल्लाही देण्यात आला आहे. युद्ध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पत्रकारांनी आम्हाला सूचना देणे आवश्यक आहे. तसे केल्यास त्या व्यक्तीची विशेष काळजी घेणे सहज शक्य होईल. मात्र, पत्रकार आम्हाला सूचना न देताच युद्धभूमीत प्रवेश करत आहेत, या गोष्टीचा आम्हाला खेद आहे, असेही तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तानचे राजदूत ममुंडजे यांचं ट्विट

अफगाणिस्तानचे राजदूत फरीद, ममुंडजे यांनी ट्विटरवरुन दानिशच्या मृत्यूसंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला. “काल रात्री कंदाहार येथे मित्र दानिश सिद्दीकीच्या हत्येच्या दु: खद बातमीने मनापासून दु: खी झाले. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश अफगाण सुरक्षा दलासोबत होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला ”असे त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :Journalistपत्रकारDeathमृत्यूwarयुद्धAfghanistanअफगाणिस्तान