जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:17 IST2025-11-19T17:03:56+5:302025-11-19T17:17:40+5:30
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात जैश-ए-मोहम्मदचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. ही संघटना भारतात हल्ल्यांसाठी आत्मघातकी पथके तयार करत आहे. या संघटने संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणा पाकिस्तानमधी जैश-ए- मोहम्मद दहशतवादी संघटनेचे कनेक्शन दिसत आहे. या संघटनेबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. भारताविरुद्ध आणखी एक हल्ला करण्यासाठी ही संघटना पैसे गोळा करत असल्याचे समोर आले आहे.
लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीदरम्यान सापडलेल्या पुराव्यांवरून जैशच्या नेत्यांनी सदापे नावाच्या पाकिस्तानी अॅपसह डिजिटल माध्यमातून निधी मागितला होता. ते महिलांच्या नेतृत्वाखालील हल्ल्याचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. ही संघटना आपल्या लोकांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे गोळा करत आहे.
'कोणी "मुजाहिद" म्हणजेच लढाऊ व्यक्तीला हिवाळी कपडे पुरवतो तो स्वतः "जिहादी" मानला जाईल. त्याचप्रमाणे, जो कोणी "जिहादी" मारला गेल्यानंतर त्याची काळजी घेतो त्याला देखील "जिहादी" मानले जाईल, असे पैसे मागणाऱ्या जैश नेत्यांनी असे म्हटले आहे.
डिजिटल फंडिंग नेटवर्कची चौकशी
देणगी २०,००० पाकिस्तानी रुपये किंवा अंदाजे ६,४०० भारतीय रुपये असल्याचे मानले जाते आणि ते बूट आणि लोकरीचे मोजे, गाद्या आणि तंबू यासारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहेत, या वस्तूंची गरज दहशतवाद्याला हल्ल्यापूर्वी किंवा नंतर जमिनीवर असू शकते. या डिजिटल फंडिंग नेटवर्कची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जैशची संघटना नवीन हल्ले करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती मिळाली आहे. जैश आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या प्रमुख दहशतवादी संघटना समन्वित हल्ल्यासाठी एकत्र येत आहेत. हे दोन्ही प्रमुख दहशतवादी गट आहेत, या संघटनांना पाकिस्तानी लष्कर आणि त्या देशाच्या गुप्तहेरांकडून निधी आणि पाठिंबा मिळतो.