मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:55 IST2025-10-03T15:55:42+5:302025-10-03T15:55:57+5:30
कुंडाच्या पृष्ठभागावरील पाणी इतके स्वच्छ आणि सुंदर आहे की ते स्वर्गासारखे वाटते, परंतु त्याची खोली आतील गुहांची रचना जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे.

मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या सौंदर्याने जितकी आकर्षित करतात तितकीच त्यांच्या गूढ आणि भयानक रहस्यांनी ती घाबरवतात. अमेरिकेतील टेक्सासमधील विम्बर्ली येथे स्थित 'जेकबची विहीर' हा असाच एक नैसर्गिक झरा आहे, ज्याला लोक 'मृत्यूची विहीर' म्हणून ओळखतात.
कुंडाच्या पृष्ठभागावरील पाणी इतके स्वच्छ आणि सुंदर आहे की ते स्वर्गासारखे वाटते, परंतु त्याची खोली आतील गुहांची रचना जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे.
४० मीटर लांबीची गुहा
नैसर्गिक कुंडाचा सुरुवातीचा व्यास हा १० मीटर रुंद आहे आणि सुमारे ४ मीटर खोल असल्याचे दिसते. तथापि, त्याच्या आत ४० मीटर लांबीची एक रहस्यमय पाण्याखालील गुहा आहे. ही एवढी वळणदार व इतकी गुंतागुंतीचे आणि चक्रव्यूहासारखी आहे की एकदा तुम्हाला आतमध्ये अडकल्यानंतर मार्ग शोधणे जवळजवळ अशक्य होऊन जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोकादायक 'जेकब्स विहिर' मध्ये आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे किंवा ते बेपत्ता आहेत.
जगभरातील अनेक साहसी गोताखोर आणि डायव्हर्स या गुहेचे रहस्य उलगडण्यासाठी येथे आले होते, परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते शेवटपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि ते रिकाम्या हाताने परत आले. जे लोक आतमध्ये गेले ते एकतर गंभीर जखमी होऊन बाहेर आले किंवा आतमध्येच राहिले आहेत. अनेकांचे मृतदेह देखील परत सापडलेले नाहीत. हा धोका असूनही आजही लोक या 'मृत्यूच्या कुंडाकडे' आकर्षित होत आहेत.