जॉर्जिया मेलोनी यांनी ८१ वर्षीय इतिहासकाराच्या विरोधात दाखल केला खटला, नक्की प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:09 PM2024-04-17T16:09:40+5:302024-04-17T16:10:34+5:30

मेलोनी यांनी टीकाकारांवर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही

Italy PM Giorgia Meloni files defamation case against luciano canfora history professor neo nazi at heart comment | जॉर्जिया मेलोनी यांनी ८१ वर्षीय इतिहासकाराच्या विरोधात दाखल केला खटला, नक्की प्रकरण काय? 

जॉर्जिया मेलोनी यांनी ८१ वर्षीय इतिहासकाराच्या विरोधात दाखल केला खटला, नक्की प्रकरण काय? 

Giorgia Meloni luciano canfora, defamation case: इटलीच्या एका न्यायालयाने मंगळवारी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दाखल केलेल्या एका मानहानीच्या खटल्याला चालवण्यास परवानगी दिली. हा खटला एका इतिहासकाराच्या विरोधात आहे. उजव्या विचारसरणीच्या नेत्याला 'नियो-नाझी विचारसरणीचा' म्हटले होते. त्यावरून हा खटला दाखल करण्यात आला असून याची सुनावणी ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मेलोनी पंतप्रधान होण्याच्या सहा महिनेआधी, एप्रिल २०२२मध्ये दक्षिण इटलीतील बारी येथील एका शाळेत वादविवाद दरम्यान ८१ वर्षीय डाव्या विचारसरणीच्या क्लासिकिस्ट लुसियानो कॅनफोरा यांनी हे भाष्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर मानहानीचा खटला चालवण्यात येणार आहे.

एएफपीशी बोलताना कॅनफोरा यांनी सांगितले की, त्यांना कोणतीही खंत नाही. ते बारी विद्यापीठात ग्रीक आणि लॅटिन भाषाशास्त्राचे माजी प्राध्यापक आहेत आणि ते इटलीमध्ये लोकप्रिय आहेत. जेव्हा तुम्ही निओ-नाझी म्हणता, तेव्हा तुम्ही अशा व्यक्तीचा विचार करत नाही, जो गुन्हा करत आहे किंवा खून करत आहे. तुम्ही अशा व्यक्तीचा विचार करता, ज्याच्याकडे अजूनही असे काही विचार आहेत जे विशिष्ट मानसिक वृत्तीचे असून भूतकाळाची आठवण करून देतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कॅनफोरा यांना अनेक इटालियन आणि परदेशी विचारवंतांनी हा खटला लढण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

कॅनफोरा म्हणाले की मेलोनी यांच्या २०२१च्या आत्मचरित्र 'आय एम जॉर्जिया' मध्ये, मेलोनी यांनी इटलीच्या युद्धानंतरच्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांबद्दल लिहिले होते. त्यात जॉर्जियो यांनी अल्मिरांते यांचा समावेश केला होता. आल्मिरांते हे आता निकामी झालेल्या इटालियन सोशल मूव्हमेंट (MSI) च्या संस्थापकांपैकी एक आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर फॅसिस्ट हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीच्या समर्थकांनी स्थापन केलेला हा पक्ष होता.

दरम्यान, मेलोनी यांनी टीकाकारांवर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी त्यांनी पत्रकार रॉबर्टो सॅव्हियानो विरुद्धचा खटला जिंकला. न्यायालयाने पत्रकाराला 1,000 युरोचा निलंबित दंड ठोठावला होता. सॅव्हियानो यांनी मेलोनी यांच्या स्थलांतरित नागरिकांबद्दलच्या भूमिकेवर टीका केली होती.

Web Title: Italy PM Giorgia Meloni files defamation case against luciano canfora history professor neo nazi at heart comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.