इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा अमेरिकन ॲडल्ट कंटेंट वेबसाइटवर डीपफेक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 08:29 AM2024-03-22T08:29:36+5:302024-03-22T08:30:16+5:30

हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे.

Italy PM Giorgia Meloni files 100,000 euros defamation lawsuit over deepfake porn videos | इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा अमेरिकन ॲडल्ट कंटेंट वेबसाइटवर डीपफेक व्हायरल

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा अमेरिकन ॲडल्ट कंटेंट वेबसाइटवर डीपफेक व्हायरल

Italy PM Giorgia Meloni Deepfake: जगभरात डीपफेकचे अनेक व्हिडीओ समोर येत असून, इटलीच्यापंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचाही एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मेलोनी यांनी ९० लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. ४० वर्षीय आरोपीने आपल्या ७३ वर्षीय वडिलांसोबत मेलोनी यांचा एक डीपफेक व्हिडीओ एका अमेरिकन ॲडल्ट कंटेंट वेबसाइटवर पोस्ट केला होता.

मेलोनी या पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणजेच २०२२ मध्ये आरोपीने डीपफेक व्हिडीओ बनवला होता. यामध्ये जॉर्जिया यांचा चेहरा एका ॲडल्ट फिल्म स्टारच्या चेहऱ्यावर लावण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्या २ जुलै रोजी न्यायालयात साक्ष देणार आहे. ॲडल्ट व्हिडीओ अपलोड करण्यासाठी वापरल्या गेलेल्या मोबाइल फोनच्या माध्यमातून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.

मेलोनी यांचा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मेलोनी यांनी बलात्काराचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या.

Web Title: Italy PM Giorgia Meloni files 100,000 euros defamation lawsuit over deepfake porn videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.