Russia-Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धात भारताच्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलली अमेरिका, केलं मोठं वक्तव्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 16:15 IST2022-02-26T16:15:01+5:302022-02-26T16:15:58+5:30
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, भारतासोबत अमेरिकेचे महत्वाचे हितसंबंध आणि मूल्ये जोडली गेलेली आहेत.

Russia-Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धात भारताच्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलली अमेरिका, केलं मोठं वक्तव्य!
वॉशिंग्टन - भारत-रशिया संबंध, हे अमेरिका आणि रशियाच्या संबंधांपेक्षा फार वेगळे आहेत आणि यात काहीही अडचण नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. याच बरबोर, आपण रशियासोबत संबंध असलेल्या प्रत्येक देशाला, नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करण्यासंदर्भातही सांगितले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
भारतासोबत अमेरिकेचे महत्त्वाचे हितसंबंध -
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, भारतासोबत अमेरिकेचे महत्वाचे हितसंबंध आणि मूल्ये जोडली गेलेली आहेत. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्राइस म्हणाले, 'भारताशी आमचे महत्त्वाचे हितसंबंध आहेत आणि आम्हाला माहीत आहे की, भारताचे रशियासोबत असलेले संबंध, आणच्या आणि रशियाच्या संबंधांपेक्षा फार वेगळे आहेत. यात कोणतीही अडचण नाही."
'भारताचे रशियाशी घनिष्ट संबंध' -
एका प्रश्नाला उत्तर देताना प्राइस म्हणाले, 'भारताचे रशियाशी घनिष्ट संबंध आहेत, तेवढे आमचे नक्कीच नाहीत. भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण विषयक संबंध आहेत. जे आमचे नाहीत. ज्यांचे संबंध आहेत आणि जे लाभ घेऊ शकतात, त्यांनी त्याचा वापर रचनात्मक पद्धतीने करावा, असे आम्ही प्रत्येक देशाला सांगितले आहे.