इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:32 IST2025-06-13T17:12:37+5:302025-06-13T17:32:15+5:30

'इस्रायली हल्ल्याची मोठी किंमत इस्रायल आणि अमेरिकेला मोजावी लागेल', असं इस्रायली हल्ल्यानंतर इराणने म्हटले.

Israel's next target is Pakistan Pakistan is scared, Pakistan is in the shadow of fear amid Iran tension | इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

शुक्रवारी सकाळी इस्रायलनेइराणच्या अणुस्थळांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड प्रमुख, लष्करप्रमुख आणि अनेक प्रमुख अणुशास्त्रज्ञ ठार झाले. दोन्ही देशातील युद्धामुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. दरम्यान, भारताने इस्रायल आणि इराणला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण पाकिस्तानमध्ये इस्रायलने इराणवरील हल्ल्याबाबत वेगळाच विचार दिसून येत आहे.

पाकिस्तानी पत्रकारांनी या हल्ल्यावरुन एक वेगळीच शंका व्यक्त केली आहे. यामुळे पाकिस्तान सध्या भीतीच्या छायेत आहे. पत्रकार हमीद मीर यांनी एक वेगळीच भीती व्यक्त केली. त्यांच्या टीव्ही कार्यक्रमात ते म्हणाले की, इस्रायलने यापूर्वीही पाकिस्तानच्या अणुस्थळांवर हल्ला करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले आहेत. 

विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार

ते म्हणाले की, इस्रायलचे पुढचे लक्ष्य पाकिस्तान असू शकते. जर सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान गप्प राहिला तर ती मोठी चूक असेल. आम्ही गप्प राहणार नाही आणि अशा कोणत्याही प्रयत्नांना योग्य उत्तर देऊ.

इराणची धमकी

दरम्यान, इस्रायली हल्ल्यानंतर, इराणने म्हटले की इस्रायली हल्ल्याची मोठी किंमत इस्रायल आणि अमेरिकेला मोजावी लागेल. इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अबोलफझल शेखरची यांनी सरकारी टीव्हीला सांगितले की, शुक्रवारी इस्रायलीने इस्रायली हल्ल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल.

इस्त्रायलचा मोठा दावा

हल्ल्यानंतर, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हल्ल्याची पुष्टी केली. या हल्ल्यात इराणचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बघेरी आणि एक प्रमुख अणुशास्त्रज्ञ देखील मृत्युमुखी पडले असल्याचा दावा इस्त्रायलने केला.

Web Title: Israel's next target is Pakistan Pakistan is scared, Pakistan is in the shadow of fear amid Iran tension