बंकर्समध्ये लपलेल्यांमध्ये प्रेम फुलावं यासाठी..इस्रायलचा नवा प्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 09:11 IST2026-03-14T09:11:03+5:302026-03-14T09:11:55+5:30

इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील स्थिती आणखी अशांत झाली आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगावरच युद्धाची काळी छाया पसरली आहे.

Israel's new experiment to make love blossom among those hiding in bunkers! | बंकर्समध्ये लपलेल्यांमध्ये प्रेम फुलावं यासाठी..इस्रायलचा नवा प्रयोग!

AI Generated Image

इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील स्थिती आणखी अशांत झाली आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगावरच युद्धाची काळी छाया पसरली आहे. लोक अस्वस्थ आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. जीव वाचविण्यासाठी लोकांना सैरावैरा पळावं लागत आहे. कुठून, केव्हा बॉम्बवर्षाव होईल आणि त्यात आपला जीव जाईल याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. 

इस्रायलमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना बंकर्सचा सहारा घ्यावा लागतो आहे. लोकांना आपलं दैनंदिन जगणं सोपं व्हावं यासाठी इस्रायलनं अनेक नावीन्यपूर्ण ॲप्स लॉन्च केली आहेत. त्यातलंच एक आहे, ‘बॉम्ब शेल्टर डेटिंग’ ॲप ! जगण्या-मरण्यावरचा लोकांचा विश्वासच उडत चालला असताना, लोकांना दिलासा मिळावा, युद्धजन्य परिस्थितीतही युवकांमधलं प्रेम बहरावं यासाठी इस्रायलनं हे डेटिंग ॲप विकसित केलं आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत ज्यावेळी सायरन वाजतो आणि लोक बंकर्समध्ये आश्रय घेण्यासाठी, लपण्यासाठी धावतात, त्यावेळी त्याच बंकरमध्ये लपलेल्या अविवाहित लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी, त्यांच्यात संवाद होण्यासाठी आणि त्यांच्यात प्रेम फुलण्यासाठी या ॲपचा उपयोग व्हावा, अशी इस्रायल सरकारची अपेक्षा आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं शेअर केलेल्या या संकल्पनेनुसार, हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यादरम्यान एकाच बंकरमध्ये लपलेले अविवाहित लोक या डेटिंग ॲपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. या बंकरमध्ये किती लोक लपलेले आहेत एवढंच नाही, तर त्यातले किती अविवाहित आहेत, किती पुरुष, किती स्त्रिया आहेत, हेदेखील हे ॲप दाखवतं. 

‘हुक्ड’ नावाच्या स्पीड-डेटिंग ॲपशी जोडलेल्या प्लॅटफॉर्ममार्फत हे ॲप कार्य करतं. लोकांनी एकमेकांना भेटावं, एकमेकांशी बोलावं आणि आपल्या भावना शेअर कराव्यात, ताणतणावातून बाहेर पडत एकमेकांना दिलासा द्यावा यासाठीही या ॲपची योजना करण्यात आली आहे. त्यामुळेच अनेक बंकर्सच्या प्रवेशद्वारावरच हा क्यूआर कोड लावण्यात आला आहे. आत येणारे लोक हा कोड स्कॅन करून त्या बंकरमध्ये अजून कोण-कोण अविवाहित आहेत हे पाहू शकतात. त्यामुळे तणावपूर्ण प्रतीक्षेचा वेळ संवाद सुरू करण्याच्या संधीमध्ये बदलतो, असं इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये या उपक्रमाची महती सांगताना ‘फक्त इस्रायलमध्येच!’ अशी नोटही टाकली आहे. बहुतांश नेटकऱ्यांना मात्र ही कल्पना फारशी पसंत पडलेली नाही आणि त्यांनी त्याबद्दल इस्रायलवर कोरडे ओढले आहेत.

युद्धकाळात लोकांचं आयुष्य त्यातल्या त्यात सुरळीत चालावं यासाठी इस्रायलनं आणखीही काही ॲप्स तयार केली आहेत. त्यापैकी एक आहे ‘बॉम्ब शेल्टर ट्रॅकर’. हे ॲप सायरन वाजल्यावर वापरकर्त्यांना किती वेळा शेल्टरकडे धाव घ्यावी लागते याची नोंद ठेवतं. रात्री वारंवार दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांमुळे लोकांची झोप किती बिघडते याचाही अंदाज ते लावू शकतं। आणखी एक उपयुक्त ॲप म्हणजे ‘शॉवर रिस्क प्रेडिक्टर’. हे ॲप अलीकडे वाजलेल्या सायरनच्या पॅटर्नचं विश्लेषण करून पुढचा सायरन कधी वाजण्याची शक्यता आहे याचा अंदाज लावतं. त्यामुळे अंघोळीसाठी नेमकं केव्हा जायचं, याची त्यातल्या त्यात ‘सुरक्षित’ वेळ लोक निवडू शकतात. मंत्रालयाच्या मते, अचानक सायरन वाजल्यावर लोक ‘डोक्यात शॅम्पू लावलेल्या अवस्थेत’ अडकू नयेत हा यामागचा उद्देश आहे!

Web Title : युद्ध के बीच प्यार! इजराइल का 'बंकर डेटिंग' ऐप

Web Summary : इजराइल ने युद्ध के बीच 'बंकर डेटिंग' ऐप लॉन्च किया है। यह ऐप बंकरों में छिपे अविवाहित लोगों को जोड़ता है। सायरन की भविष्यवाणी करने वाले और आश्रय ट्रैकिंग ऐप भी बनाए गए हैं, जिससे लोगों को सामान्य जीवन जीने में मदद मिलती है।

Web Title : Israel's 'Bomb Shelter Dating' App Aims to Spark Love Amidst Conflict

Web Summary : To ease daily life amid conflict, Israel launched 'Bomb Shelter Dating'. It connects unmarried individuals in bomb shelters, fostering connections during emergencies. Other apps track shelter visits and predict siren timings, aiding normalcy.