शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 20:00 IST

Australia Firing: इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हा यहुदांवरील क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील प्रसिद्ध बॉन्डी बीचवर हनुका उत्सवादरम्यान रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. दोन बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १० ज्यू नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या उत्सवात सुमारे दोन हजार ज्यू बांधव सहभागी झाले होते. पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. यानंतर आता इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हा यहुदांवरील क्रूर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले इसाक हर्जोग? -इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी या 'घृणास्पद' कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. "हनुकाची पहिली मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी एकत्र आलेल्या आमच्या ज्यू बंधू-भगिनींवरील हा क्रूर हल्ला आहे. संपूर्ण राष्ट्र पीडितांसोबत आहे. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तसेच या हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्यांसाठीही प्रार्थना करतो." याच बरोबर, ऑस्ट्रेलिया सरकारने देशात वाढत असलेल्या ज्यूविरोधी प्रतिक्रियांविरोधात तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही हर्जोग यांनी केली आहे.

त्या घोषणा आज खऱ्या ठरल्या -परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी या हल्ल्याला 'क्रूर हत्या', असे संबोधले आहे. ते म्हणाले, "गेल्या दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या ज्यूविरोधी उन्मादाचा हा परिणाम आहे. ज्यूविरोधी भडकाऊ घोषणा अनेकदा देण्यात आल्या, ज्या आज सत्य ठरल्या आहेत." एवढेच नाही तर, "ऑस्ट्रेलिया सरकारला अनेक वेळा संकेत मिळाले होते. त्यांनी भानावर यायला हवे," अशा कठोर शब्दांत सार यांनी टीका केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel condemns Sydney synagogue shooting during Hanukkah; demands action.

Web Summary : Israel condemns the Sydney synagogue shooting during Hanukkah, calling it a 'cruel attack.' President Herzog urges Australia to combat rising anti-Semitism. Officials cite prior warnings ignored by the government.
टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाTerrorismदहशतवादIsraelइस्रायलDeathमृत्यू