शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारी महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू येणार भारतभेटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 22:16 IST

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू २०१८ साली जानेवारी महिन्यात भारतात येत आहेत.

जेरुसलेम-  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू २०१८ साली जानेवारी महिन्यात भारतात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी इस्रायचा एेतिहासिक दौरा केल्यानंतर भारत आणि इस्रायल यांनी द्वीपक्षीय संबंधांमध्ये नवे पाऊल टाकले आहे. इस्रायलभेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यानाहू यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते, त्याचा स्वीकार नेत्यानाहू यांनी केला होता. भारताला भेट देणारे नेत्यानाहू हे दुसरे इस्रायली पंतप्रधान ठरतील. यापुर्वी २००३ साली अरायल शेराँन यांनी भारताला भेट दिली होती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर तेव्हा चर्चा केली होती. इस्रायल आणि भारत यांच्या संबंधांना तेव्हापासून गती मिळाली होती. यावर्षी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनयीक संबंध प्रस्थापित होण्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारत-इस्रायल यांच्या संबंधांवर दृष्टीक्षेप१९९२ - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित१९९७- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट२०००- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट२००३- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट२००६- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट२०१२- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट२०१४- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. २०१४- टवीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद२०१४- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट२०१५- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)२०१५- भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती२०१६- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा इस्रायल दौरा२०१७- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा इस्रायल दौरा, जगभरात चर्चा, विविध करारांवर स्वाक्षर्या        व्यापारी संबंधभारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत