शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

"हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा", इस्रायलची युद्धादरम्यान भारताकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 10:10 IST

Israel-Hamas War : भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी बुधवारी सांगितले की, भारताने इतर अनेक देशांप्रमाणे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी बुधवारी सांगितले की, भारताने इतर अनेक देशांप्रमाणे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे. 

पत्रकारांशी संवाद साधताना इस्रायलच्या राजदूत नाओर गिलोन यांनी हमासविरुद्धच्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आभारही व्यक्त केले. तसेच, इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर संबंधित भारतीय अधिकाऱ्यांना हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची विनंती केली आहे. यासोबतच हा मुद्दा यापूर्वीही उपस्थित करण्यात आल्याचे नाओर गिलोन यांनी सांगितले.

राजदूत नाओर गिलोन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महत्त्वाचे देश आमच्या पाठीशी आहेत. ही जगातील लोकशाही आहे. असे सांगून मला वाटते की भारताने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे. अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय संघासह अनेक देशांनी हमासला यापूर्वीच दहशतवादी संघटना घोषित केले आहे, असे नाओर गिलोन यांनी सांगितले. 

याचबरोबर, नाओर गिलोन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक होते. भारत हा जगातील महत्त्वाची नैतिक ओळख असलेला देश आहे आणि आपल्यासाठी महत्त्वाचे देश आपल्यासोबत आहेत. भारताने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. तसेच, इस्रायलसाठी हे पश्चिम आशियातील अस्तित्वाचे युद्ध आहे. हमासचा नायनाट करण्यासाठी इस्रायल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारतPalestineपॅलेस्टाइनGaza Attackगाझा अटॅक