इस्रायलनं इराणच्या २ नेत्यांची नावे 'हिटलिस्ट'मधून वगळली; पाकिस्ताननं पडद्यामागून टाकले फासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 20:57 IST2026-03-26T20:53:27+5:302026-03-26T20:57:03+5:30

इस्रायलकडे अराघची आणि गालिबफ यांच्या ठिकाणांची माहिती होती. इस्रायल या दोन्ही नेत्यांना हल्ला करून मारणार होते.

Israel took Parliamentary Speaker Mohammad Baqer Qalibaf off its hit list after Pakistan requested that Washington not target him | इस्रायलनं इराणच्या २ नेत्यांची नावे 'हिटलिस्ट'मधून वगळली; पाकिस्ताननं पडद्यामागून टाकले फासे

इस्रायलनं इराणच्या २ नेत्यांची नावे 'हिटलिस्ट'मधून वगळली; पाकिस्ताननं पडद्यामागून टाकले फासे

तेल अवीव - इस्रायलनंइराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघर गालिबफ यांच्यावर हल्ला न करण्याचा शब्द दिला आहे. अमेरिकेच्या सांगण्यावरून इस्रायलने या दोन नेत्यांची नावे हिटलिस्टमधून हटवली आहेत, ज्या नेत्यांना त्यांना मारायचे आहे. पाकिस्तानने अमेरिकेला विनंती करून हे काम केले. अराघची आणि गालिबफ यावेळी इराणमधील खूप महत्त्वाचे नेते आहेत कारण देशातील बहुतांश बड्या नेत्यांची इस्रायलने २८ फेब्रुवारीनंतर हत्या केली आहे.

पाकिस्तानी सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. इस्रायलने अब्बास अराघची आणि मोहम्मद बाघर गालिबफ यांची नावे हिटलिस्टच्या यादीतून वगळवली आहेत. पाकिस्तानने अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आग्रह धरला त्यानंतर इस्रायलने हे पाऊल उचलले आहे. इस्रायलवर दबाव टाकून या दोन नेत्यांना टार्गेटवरून हटवले जावे अशी मागणी पाकिस्तानने अमेरिकेकडे केली होती.

दोन्ही नेत्यांवर होणार होते हल्ले

रिपोर्टनुसार, इस्रायलकडे अराघची आणि गालिबफ यांच्या ठिकाणांची माहिती होती. इस्रायल या दोन्ही नेत्यांना हल्ला करून मारणार होते. परंतु पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली. जर या दोन नेत्यांना संपवले तर चर्चेसाठी कुठलाही मोठा उरणार नाही असं पाकिस्तानने सांगितले. त्यामुळे अमेरिकेने इस्रायलला सांगून या दोन नेत्यांना टार्गेटवरून वगळले जावे असं सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायली लष्कर आणि बेंजामिन नेतान्याहू यांच्याही कार्यालयाने रॉयटर्सच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शांतता चर्चेची शक्यता पडताळण्यासाठी इराणच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील हल्ला "काही दिवसांसाठी" पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलनेही केला आहे.

पाकिस्तानचे मध्यस्थीचे प्रयत्न

इस्रायल-इराण संघर्ष संपवण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की यांच्याकडून होत असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर अराघची आणि गालिबफवर हा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानने वॉशिंग्टन आणि तेहरान या दोन्ही देशांशी थेट संपर्क ठेवला आहे. इस्लामाबादकडे शांतता चर्चेसाठी एक संभाव्य ठिकाण म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेने पाकिस्तानमार्फत इराणला १५-कलमी प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार इराणचा समृद्ध युरेनियमचा साठा हटवणे, संवर्धन थांबवणे, त्याचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम गोठवणे आणि त्याच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांना दिला जाणारा निधी थांबवणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. इराणने हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Web Title : इज़राइल ने हिट लिस्ट से ईरानी नेताओं को हटाया; पाकिस्तान ने मध्यस्थता की।

Web Summary : रिपोर्ट के अनुसार, पाकिस्तान के अनुरोध पर अमेरिका के हस्तक्षेप के बाद इज़राइल ने दो ईरानी नेताओं को अपनी हिट लिस्ट से हटा दिया, ताकि तनाव कम हो और भविष्य में बातचीत हो सके। पाकिस्तान, ईरान और अमेरिका के बीच मध्यस्थता करने की कोशिश कर रहा है।

Web Title : Israel removes Iranian leaders from hit list; Pakistan mediates.

Web Summary : Reportedly, Israel removed two Iranian leaders from its hit list after US intervention, prompted by Pakistan's request to de-escalate tensions and enable future talks. Pakistan is attempting to mediate between Iran and the US.