इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 18:56 IST2025-09-07T18:56:00+5:302025-09-07T18:56:19+5:30
८० व्या संयुक्त राष्ट्र महासभेत, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देण्याचा ठराव केलेला आहे.

इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
एकीकडे गाझापट्टीत हमासविरोधात युद्ध सुरु ठेवलेले असताना इस्रायलने अचानक आपली एअरस्पेस बंद केल्याने खळबळ उडाली आहे. इस्रायलने याचे कारणही दिलेले नाही यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
इस्रायलच्या दक्षिणेकडील रॅमोन विमानतळावरील इस्रायली हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, असे विमानतळ प्राधिकरणाने कळविले आहे. न्यूज बेबसाईच वायनेटने यासाठी लष्कराचा हवाला दिला आहे. या विमानतळावर ड्रोन कोसळल्याचे लष्करी सुत्रांनी सांगितले आहे. परंतू, लष्कराने अधिकृत कोणतेही विधान जारी केले नाही.
या घडामोडींआधी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पॅलेस्टीन राज्याला मान्यता देण्याच्या अलिकडच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना चुकीचे म्हटले होते. यामुळे आमच्याकडून एकतर्फी प्रतिक्रिया येऊ शकते, अशी धमकी त्यांनी दिली होती. यामुळे या एअरस्पेस बंद करण्यामुळे पुन्हा मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न होणार असे कयास बांधले जात आहेत.
८० व्या संयुक्त राष्ट्र महासभेत, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देण्याचा ठराव केलेला आहे.