"आमच्या सर्व लोकांना सोडा, मग आम्हीपण..."; युद्धादरम्यान हमासने दिली मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:59 AM2023-11-30T11:59:42+5:302023-11-30T12:01:24+5:30

Israel-Hamas War : हमासने अनेक इस्रायली ओलिसांची सुटकाही केली. या संदर्भात हमासने इस्रायल सरकारला मोठी ऑफर दिली आहे.

israel palestine war hamas ready to release all israeli soldiers for all palestine prisoners benjamin netanyahu | "आमच्या सर्व लोकांना सोडा, मग आम्हीपण..."; युद्धादरम्यान हमासने दिली मोठी ऑफर

फोटो- AFP

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला 54 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र याच दरम्यान, दोन्ही बाजूंनी एकदा चार दिवस आणि दुसरे दोन दिवस युद्धविराम लागू करण्यात आला. यावेळी इस्रायलने ओलीस ठेवलेल्या पॅलेस्टिनी लोकांना सोडले. त्याचवेळी हमासने अनेक इस्रायली ओलिसांची सुटकाही केली. या संदर्भात हमासने इस्रायल सरकारला मोठी ऑफर दिली आहे. हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गाझावरील युद्धविराम वाढवण्याच्या चर्चेदरम्यान महत्त्वाची माहिती दिली आहे.  

"आम्ही आमच्या सर्व लोकांच्या बदल्यात सर्व सैनिकांना सोडण्यास तयार आहोत" असं हमासचे अधिकारी आणि गाझाचे माजी आरोग्य मंत्री बसेम नईम यांनी दक्षिण आफ्रिकेच्या भेटीदरम्यान केपटाऊन येथे पत्रकार परिषदेत सांगितले. गाझाच्या हमास गटाने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या एका मोठ्या हल्ल्यात दक्षिण इस्रायलमध्ये सुमारे 240 लोकांना ओलीस ठेवलं. इस्रायली अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की सुमारे 1,200 लोक मारले गेले, त्यापैकी बहुतेक नागरिक होते.

प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे आणि हवाई आणि जमिनीवर हल्ले करण्याची एक मोठी मोहीम सुरू केली आहे, ज्यात सुमारे 15,000 लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतांश नागरिकांचा समावेश आहे, असे हमास सरकारचे म्हणणे आहे. युद्धविराम करारानुसार, सुमारे 60 इस्रायली ओलीस आणि 180 पॅलेस्टिनीची सुटका करण्यात आली आहे.

हमासने अजूनही ओलीस ठेवलेल्या सैनिकांमध्ये एक्सचेंज पॉलिसीमधून वगळण्यात आलेल्या सैनिकांचाही समावेश आहे. 2011 मध्ये हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली सैनिक गिलाड शालितच्या सुटकेच्या बदल्यात सरकारने 1,000 हून अधिक पॅलेस्टिनींची सुटका केली होती. हमासचे म्हणणे आहे की इस्रायली तुरुंगात 7,000 हून अधिक पॅलेस्टिनी आहेत, त्यापैकी बरेच तरुण आणि स्त्रिया आहेत.

ऑक्टोबरमध्येच हमासने इस्रायलकडे सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली होती, परंतु त्यावेळी इस्रायल सरकारने त्या बदल्यात सर्व ओलीस सोडण्याची तयारी दर्शवली होती. इस्रायली सरकारचा नवीन प्रस्ताव शत्रुत्वावरील स्थगिती वाढवण्याचे प्रयत्न तीव्र झाल्यामुळे आला.

हमास गटाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की हमास चार दिवसांसाठी युद्धविराम वाढवण्यास आणि आणखी इस्रायली ओलीस सोडण्यास तयार आहे. नईम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मध्यस्थांसोबत कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही दोन ते तीन आठवड्यांपूर्वी पुष्टी केली की इस्रायली बॉम्बहल्ल्यात 60 इस्रायली ठार झाले आहेत आणि अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. 
 

Web Title: israel palestine war hamas ready to release all israeli soldiers for all palestine prisoners benjamin netanyahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.