Israel-Palestine Conflict : पॅलेस्टाईन, काश्मीरसाठी अणुबॉम्ब टाका, कशाला ठेवलेत?; पाकिस्तानी संसदेत खासदार बरळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:58 AM2021-05-19T10:58:13+5:302021-05-19T10:59:41+5:30

Gaza attack: कंगाल झालेल्या पाकिस्तानने तर पॅलेस्टीनींना कोरोना मदत पाठविण्याची घोषणा केली आहे. तुर्की आणि पाकिस्तानला असे वाटत आहे की, या द्वारे आपण मुस्लिम देशांची सहानुभूती मिळवू आणि मुस्लिमांचे नेते बनू. 

Israel-Palestine Conflict : Maulana Chitrali says Pakistan have to use atom bomb on Palestine, Kashmir Issue | Israel-Palestine Conflict : पॅलेस्टाईन, काश्मीरसाठी अणुबॉम्ब टाका, कशाला ठेवलेत?; पाकिस्तानी संसदेत खासदार बरळला

Israel-Palestine Conflict : पॅलेस्टाईन, काश्मीरसाठी अणुबॉम्ब टाका, कशाला ठेवलेत?; पाकिस्तानी संसदेत खासदार बरळला

googlenewsNext

Gaza attack: इस्लामाबाद : पॅलेस्टाईनवर इस्त्रायलकडून (Israel attack on Palestine) जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलविरोधात पाकिस्तान (Pakistan) हा तुर्कस्तानसोबत (Turkstan) मिळून षडयंत्र रचत आहे. यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पॅलेस्टाईनच्या बहाण्याने तुर्कीला गेले असून मुस्लिम देशांची आघाडी उघडण्याचे स्वप्न पाहत आहेत. अशावेळी पाकिस्तानच्या एका खासदाराने इस्त्रायल आणि भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे वक्तव्य केले आहे. (Member national assembly Maulana Chitrali says jihad against Israel is the only option for Pakistan.)


इस्त्रायलविरोधात 57 मुस्लिम देशांना एकत्र आणण्यासाठी सोमवारी एक परिषद बोलविण्यात आली होती. हे देश इस्त्रायलविरोधात एकत्र येण्याऐवजी आपापसातच भिडले आहेत. अशावेळी पाकिस्तानचे खासदार मौलाना चित्राली यांनी इम्रान खान सरकारला इस्त्रायलविरोधात जिहादच एकमेव उपाय असल्याचे म्हटले आहे. 


मौलाना चित्राली यांनी पाकिस्तानी संसदेमध्ये हे वक्तव्य केले आहे. पॅलेस्टाईन आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सरकारने अणुबॉम्ब आणि मिसाईलचा वापर करण्यास मागे पुढे पाहू नये. आम्ही अणुबॉम्ब काय म्युझियममध्ये पाहण्यासाठी बनविले आहेत का? जर आम्ही पॅलेस्टाईन आणि काश्मीरला स्वतंत्र करू शकत नाही तर आम्हाला मिसाईल, अणुबॉम्ब आणि विशाल सैन्याती काहीच गरज नाहीय, अशी दर्पोक्ती चित्राली यांनी केली. 



पॅलेस्टाईनवर इस्त्रायलने केलेला हल्ला ही पाकिस्तान आणि तुर्की या देशांना एक संधी साधून आली आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानने तर पॅलेस्टीनींना कोरोना मदत पाठविण्याची घोषणा केली आहे. तुर्की आणि पाकिस्तानला असे वाटत आहे की, या द्वारे आपण मुस्लिम देशांची सहानुभूती मिळवू आणि मुस्लिमांचे नेते बनू. 


Israel-Palestine Conflict : गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच; एअरस्ट्राइकमध्ये 213 जणांचा मृत्यू, एकमेव कोरोना लॅबही उद्ध्वस्त

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले जात आहेत, तर इस्रायलदेखील एअरस्ट्राइक करून हमासला प्रत्युत्तर देत आहे. हे सर्व हल्ले गाझामध्ये होत आहेत. इस्रायलच्या या हल्ल्यांत गाझा येथील एकमेव कोरोना टेस्टिंग लॅबही उद्ध्वस्त झाली आहे.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इस्लामिक समूह हमासविरोधात सुरू असलेल्या इस्रायली युद्धाचा परिणाम सामान्य लोकांवर होत आहे. इस्रायलकडून मानवी वस्ती असलेल्या भागांत करण्यात आलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत 213 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात 61 मुलांचा समावेश आहे. याशिवाय 1400 हून अधिक नागरीक जखमी झाले आहेत.
 

Web Title: Israel-Palestine Conflict : Maulana Chitrali says Pakistan have to use atom bomb on Palestine, Kashmir Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.