"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:11 IST2025-06-21T19:11:29+5:302025-06-21T19:11:40+5:30

महत्वाचे म्हणजे, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले असतानाच अमेरिकी अंतरिम प्रभारी डोरोथी शीया यांचे  हे विधान आले आहे. 13 जूनपासून सुरू जालेला हा संघर्ष सातत्याने वाढतांनाच दिसत आहे. इस्रायलने इराणच्या अणु आणि सैन्य ठिकानांवर हल्ले केले आहेत. यानतंर इराणनेही इस्रायलवर मिसाईल हल्ला केला होता.

Israel is guilty of terror and destruction US statement at UN surprises everyone Video goes viral | "दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल

"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल

इस्रायल-इराण संघर्षला आज 9 दिवस झाले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर जबरदस्त प्रहार सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत एका वरिष्ठ अमेरिकन राजदूताने असे काही विधान केले, जे ऐकूण सर्वच चकित झाले. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरे तर, त्यांच्याकडून चुकून, या युद्धासाठी इस्रायल दोषी असल्याचे म्हटले गेले. मात्र, चूक लक्षात येताच, त्यांनी चूक सुधारली.

व्हिडिओमध्ये नेमके काय? -
खरे तर, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या अंतरिम प्रभारी डोरोथी शिया यांच्याकडून इराणच्या प्रादेशिक कृतींचा निषेध करताना, आपल्या भाषणात चूक झाली. संबोधित करताना डोरोथी शीया आधी म्हणाल्या, "इस्रायल सरकार नेही संपूर्ण प्रदेशात अराजकता आणि दहशत पसरवली आहे." मात्र, त्यांनी लगेचच आपली चूक दुरुस्त केली आणि म्हणाल्या, "इराण सरकारने संपूर्ण प्रदेशात अराजकता आणि दहशत पसरवली आहे." त्यांचे भाषण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हडिओ आता सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होत आहे. 

अमेरिकेनं इस्रायलला दिलाय समर्थनाचा विश्वास -
आपल्या निवेदनात अमेरिकेच्या अंतरिम प्रभारी डोरोथी शिया म्हणाल्या, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचा सहभाग नाही. मात्र, अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभी आहे आणि इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षांविरुद्ध त्यांच्या कारवाईला पाठिंबा देते, यात काहीही शंका नाही.

महत्वाचे म्हणजे, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले असतानाच अमेरिकी अंतरिम प्रभारी डोरोथी शीया यांचे  हे विधान आले आहे. 13 जूनपासून सुरू जालेला हा संघर्ष सातत्याने वाढतांनाच दिसत आहे. इस्रायलने इराणच्या अणु आणि सैन्य ठिकानांवर हल्ले केले आहेत. यानतंर इराणनेही इस्रायलवर मिसाईल हल्ला केला होता.

Web Title: Israel is guilty of terror and destruction US statement at UN surprises everyone Video goes viral