'मिस्टर ट्रम्प, तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण आम्ही संपवू...', इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:59 IST2025-06-23T14:58:46+5:302025-06-23T14:59:22+5:30

Israel-Iran War: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या एन्ट्रीने युद्धाची तीव्रता वाढली आहे.

Israel-Iran War: 'Mr. Trump, you started this war, but we will finish it...', direct threat from the Iranian military | 'मिस्टर ट्रम्प, तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण आम्ही संपवू...', इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

'मिस्टर ट्रम्प, तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण आम्ही संपवू...', इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

Israel-Iran War: इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली अन् इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या हल्ल्याचा रशिया आणि चीनसह अनेक देशांनी निषेध केला. दरम्यान, आता इराणचे लष्कर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'जुगारी' म्हटले असून, अमेरिकेला हल्ल्याची थेट धमकीही दिली आहे. 

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघारी म्हणतात की, अमेरिकेने इराण आणि इस्रायलमधील युद्धात थेट प्रवेश करुन इराणच्या "पवित्र भूमी"चे उल्लंघन केले आहे. अमेरिकेला आता अत्यंत शक्तिशाली आणि लक्ष्यित ऑपरेशन्स द्वारे जबरदस्त आणि अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागेल. अमेरिकेच्या अध्यक्षांना उद्देशून झोल्फाघारी म्हणाले, "मिस्टर ट्रम्प, जुगारी! तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण ते आम्हीच संपवू..!" अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.

अमेरिकेने इराणवर चालवले 'मिडनाइट हॅमर'!
अमेरिकेने रविवारी (22 जून 2025) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यामुळे इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही." याच बरोबर, "इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल, असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

 

 

Web Title: Israel-Iran War: 'Mr. Trump, you started this war, but we will finish it...', direct threat from the Iranian military

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.