"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:07 IST2025-06-22T19:05:07+5:302025-06-22T19:07:09+5:30

यावेळी अमेरिकेला इशारा देत मेदवेदेव म्हणाले, आता आपण उघडपणे म्हणू शकतो की भविष्यात अण्वस्त्रांचे उत्पादन आणि संवर्धन सुरूच राहील...

Israel iran war many nations ready to supply iran their nuclear warheads russia Former Russian President dmitry medvedev claims | "...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

अमेरिकेने इराणच्या 3 अणुकेंद्रांवर शनिवारी मध्यरात्री B-2 बॉम्बर्सच्या सहाय्याने मोठा हल्ला केला. यानंर, आपण फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील न्युक्लिअर साइट्स उद्धवस्त केचा दावा अमेरिकेने केला. मात्र, आपले फारसे नुकसान झाले नसल्याचे इराणने म्हटले आहे.

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर, आपण सोमवारी मॉस्को येथे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भेटणार असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, अनेक देश इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार आहेत, असा दावा रशियाचे माजी राष्ट्रपती तथा रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.

'अण्वस्त्रांचे उत्पादन सुरूच राहणार - 
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर, मेदवेदेव यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, शांततेचा दावा करत सत्तेवर आलेले डोनाल्ड ट्रम्प, आता अमेरिकेला मध्यपूर्वेच्या युद्धात ढकलत आहेत. एवढेच नाही तर, अमेरिकेच्या हल्ल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, इराणचे फार काही नुकसान झाल्यासारखे दिसत नाही, असेही दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.   

यावेळी अमेरिकेला इशारा देत मेदवेदेव म्हणाले, आता आपण उघडपणे म्हणू शकतो की भविष्यात अण्वस्त्रांचे उत्पादन आणि संवर्धन सुरूच राहील. तसेच, अनेक देश इराणला त्यांची अण्वस्त्रे देण्यास तयार आहेत, असा दावाही केला आहे. मात्र, यात कोण कोणत्या देशांचा समावेश होतो, हे त्यांनी उघड केले नाही. 

इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची घेणार पुतिन यांनी भेट -
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अराघची म्हणाल, "रशिया हा इराणचा मित्र आहे. आम्ही नेहमीच एकमेकांशी चर्चा करत असतो. मी आज दुपारी मॉस्को येथे जात असून उद्या सकाळी रशियन राष्ट्रपतींसोबत गंभीर चर्चा करेन." त्यांनी ही माहिती इस्तांबुल येथे OIC (इस्लामिक सहकार्य संघटना) शिखर परिषदेदरम्यान आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

अराघची-पुतिन यांच्या भेटीसंदर्भात चर्चांना उधाण -
अराघची आणि पुतिन यांच्या भेटीसंदर्भात चर्चांना उधाण आले आहे. आता इराण अमेरिकेविरोध राजकीय आणि लष्करी रणनीतीत रशियाची मदत घेऊ शकतो. तत्पूर्वी, रशियाने इराणवर केलेल्या कारवाईसंदर्भात रशियाने नाराजीही व्यक्त केली होती.

Web Title: Israel iran war many nations ready to supply iran their nuclear warheads russia Former Russian President dmitry medvedev claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.