इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:41 IST2025-06-17T13:40:21+5:302025-06-17T13:41:07+5:30

Israel Iran Conflict: ऑपरेशन रायझिंग लायनच्या सुरुवातीला इस्राइलने इराणमधील बडे संशोधक आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांची हत्या केली होती. आता या संघर्षादरम्यान, आता इराणच्या आणखी एका बड्या लष्करी अधिकाऱ्याची हत्या केल्याचा दावा इस्राइलने केला आहे.

Israel Iran Conflict: Israel strikes another big blow to Iran, claims to have killed Chief of Army Staff Ali Shadmani | इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  

इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  

इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या शुक्रवारपासून  सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यात इस्राइलने इराणमधील बडे संशोधक आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांची हत्या केली आहे. या संघर्षादरम्यान, आता इराणच्या आणखी एका बड्या लष्करी अधिकाऱ्याची हत्या केल्याचा दावा इस्राइलने केला आहे. इराणच्या सशस्त्र संरक्षण दलांचे नवनियुक्त चीफ ऑफ आर्मी स्टाफ आणि वरिष्ठ सैन्य कमांडर अली शादमानी यांना मारल्याचा दावा इस्राइली संरक्षण दलाने (आयडीएफ) केला आहे. अली शादमानी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निकटवर्तीय सल्लागार होते.

आयडीएफने शादमानी यांच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, इस्राइली हवाई दलांनी सोमवार आणि मंगळवारदरम्यान रात्री तेहरानमधील सेंट्रल भागात केलेल्या हल्ल्यामध्ये शादमानी हे मारले गेले आहेत. हा हल्ला इस्राइलच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अचून माहितीच्या आधारावर करण्यात आला.

शादमानी हे इराणच्या सशस्त्र दलांच्या एमर्जन्सी कमांड आणि खातम अल-अनबिया मुख्यालयाचे कमांडर होते. इस्राइलविरोधातील संघर्षात इराणसाठी युद्धाची रणनीती आखण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते, अशी माहितीही इस्राइलने दिली आहे. दरम्यान, १२ जून रोजी इस्राइली सुरक्षा दलांनी ऑपरेशन रायझिंग लायनची सुरुवात केल्यावर सुरुवातीलाच मेजर जनरल गोलाम अली रशिद यांची हत्या केली होती. त्यानंतर शादमानी यांची चीफ ऑफ स्टाफपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: Israel Iran Conflict: Israel strikes another big blow to Iran, claims to have killed Chief of Army Staff Ali Shadmani