जखमींवर उपचार करताना डॉक्टरासमोर आला स्वत:च्या मुलाचा मृतदेह; पाहा वेदनादायक VIDEO...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 16:05 IST2023-10-18T16:05:00+5:302023-10-18T16:05:54+5:30
Israel Hamas War: इस्रायल-हमास युद्धामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

जखमींवर उपचार करताना डॉक्टरासमोर आला स्वत:च्या मुलाचा मृतदेह; पाहा वेदनादायक VIDEO...
Israel Hamas War: इस्रायल आणि हमास, यांच्यातील युद्ध आणखीच भीषण झाले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून दोन्ही बाजूने भीषण हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यात सूमारे चार हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दहा हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. यादरम्यान अनेक वेदनादायक कहाण्या समोर येत आहेत. अशीच एक कहाणी पॅलेस्टिनी डॉक्टरची आहे.
हा पॅलिस्टिनी डॉक्टर रात्रंदिवस जखमींवर उपचार करत होता, मात्र काल त्याच्यासमोर त्याच्याच मुलाचा मृतदेह आला. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हा मुलगा मारला गेला. मुलाचा मृतदेह पाहून त्या पित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या डॉक्टराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
— فيديوهات منوعة (@EsmailBaher) October 15, 2023
या डॉक्टराचे कुटुंब गाझा पट्टीत राहते. गेल्या दोन आठवड्यापासून इस्रायली सैन्य गाझा पट्टीतील हमासच्या ठाण्यांवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. याच हल्ल्यात डॉक्टराचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. मुलाचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील अनेक जण जखमी झाले. व्हायरल डॉक्टर जखमींवर उपचार करताना दिसत आहे, यादरम्यान त्याच्याच मुलाचा मृतदेह स्ट्रेचरवर दिसताच डॉक्टरला रडू कोसळतं.