गाझामध्ये लादेनच्या बालेकिल्ल्यात घुसले इस्रायलचे सैन्य; हमास आणखी कमकुवत होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:58 IST2023-12-04T13:52:43+5:302023-12-04T13:58:48+5:30
Israel Hamas War in Gaza: 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत विराम मिळाला आणि त्यानंतर पुन्हा लढाई सुरू झाली

गाझामध्ये लादेनच्या बालेकिल्ल्यात घुसले इस्रायलचे सैन्य; हमास आणखी कमकुवत होणार?
Israel Hamas War in Gaza : दक्षिण इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीमध्ये लढाई सुरू आहे. हमासच्या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायलींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात 15 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन्ही बाजू आपापले दावेही करत आहेत. इस्रायल हमासचा नायनाट करण्याच्या वल्गना करत आहे, पण हे कधी होणार? तशातच आता इस्रायली सैन्याने लादेनचा गड असलेल्या विभागात घुसण्यात यश मिळवल्याने, आता हे युद्ध नवे वळण घेणार आहे का? असा सवाल केला जात आहे.
गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. 7 ऑक्टोबर रोजी लढाई सुरू झाल्यानंतर, 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत विराम मिळाला आणि त्यानंतर पुन्हा लढाई सुरू झाली. 24 नोव्हेंबरपूर्वी बहुतेक इस्त्रायली हल्ले उत्तर गाझामध्ये होते, IDF ने उत्तर गाझाचा बराचसा भाग ताब्यात घेतला होता. तात्पुरत्या युद्धबंदीनंतर, IDF त्या हमास युनिट्सना लक्ष्य करत आहे जे अजूनही संघटनात्मक प्रतिकार करत आहेत. आयडीएफने खान युनिसच्या आसपासच्या भागात हवाई हल्ले आणि गोळीबार केला आहे, जो गाझाचा बिन लादेन याह्या सिनवारचा बालेकिल्ला आहे. इस्रायलचे सैन्य तेथे घुसले आहे. मात्र, इस्रायलने अद्याप तेथे मोठ्या प्रमाणात सैन्य पाठवलेले नाही.
जेरुसलेम पोस्टच्या अहवालानुसार, युद्धाच्या या टप्प्यावर असे दिसते की नजीकच्या काळात ओलिसांना परत करण्याची आशा नसल्यासच IDF आपले सैन्य दक्षिणेकडे हलवेल. एकदा इस्रायली सैन्याने पूर्णपणे दक्षिण गाझाच्या दिशेने वाटचाल केली की, इस्रायलला हमासवर थेट हल्ला करणे आणि आणखी ओलीस सोडवणे यापैकी एक निवडावा लागेल. आतापर्यंत हमासला कमकुवत करण्यात इस्रायलला यश आले आहे. त्याचवेळी ओलीसांची सुटका करण्यासाठी त्यांना एका आठवड्याची युद्धविरामही लावावी लागली. ज्यामध्ये 114 ओलिसांची सुटका करण्यात यश आले आहे, परंतु तेवढेच लोक अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. अशा स्थितीत हे युद्ध आता कोणत्या दिशेने जाणार हा प्रश्न आहे.