"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 21:46 IST2026-04-08T21:45:45+5:302026-04-08T21:46:27+5:30

Iran warned America: शस्त्रसंधी झाल्यानंतरही पश्चिम आशियातील संघर्ष पूर्णपणे निवळला नाही. इस्रायलने शस्त्रसंधीनंतर लेबनानवर हवाई हल्ले केल्याने इराण भडकला आहे. 

Israel continues attacks on Lebanon; Iran warns to scrap ceasefire deal with US | "...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा

"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा

शस्त्रसंधी झाल्यानंतर इस्रायलनेइराणवरील हल्ले थांबवले, पण हिजबुल्लाहचे ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचे सांगत लेबनानमध्ये तुफान हल्ले केले. बैरुत, टायर या शहरांसह दक्षिण लेबनानमधील अनेक शहरात मिसाईल्स डागण्यात आल्या. इस्रायलच्या या कृतीवर इराणने संताप व्यक्त केला असून तत्काळ हल्ले थांबले नाही, तर इराण शस्त्रसंधी करारातून बाहेर पडेल, असा इशारा अमेरिकेला दिला आहे. 

इस्रायलने लेबनानमध्ये नागरी वसाहतीवर हल्ले केले. यात मोठी जीवितहानी झाली आहे. हिजबुल्लाहला लक्ष्य करत असल्याचे सांगत हे हल्ले केले. इराणने होत असलेल्या हल्ल्यांना कडाडून विरोध केला आहे. तस्नीम वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, लेबनानवरील हल्ले थांबले नाही, तर इराण शस्त्रसंधी करारातून बाहेर पडेल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.  

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही लेबनानवरील हल्ल्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शस्त्रसंधीमध्ये लेबनानचाही समावेश करायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. 

शस्त्रसंधीचे उल्लंघन, संयम बाळगावा - पाकिस्तानचे पंतप्रधान

लेबनानमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. 

वाचा >> इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, व्हिडीओ बघा

"संघर्षग्रस्त क्षेत्रातील काही ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे वृत्त येत आहे. हे कृत्य शांतता प्रक्रियेच्या गाभ्यालाच हानी करणारे आहे. मी सर्व देशांना प्रामाणिक आवाहन करू इच्छितो की, त्यांनी संयम बाळगावा आणि अटींनुसार दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाचा आदर ठेवावा. जेणेकरून कुटनीतीतून या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा निघू शकेल."

Web Title : लेबनान पर हमले के बाद ईरान ने अमेरिका को चेतावनी दी: युद्धविराम समझौता तोड़ देंगे

Web Summary : ईरान ने धमकी दी कि अगर हिज़्बुल्लाह को निशाना बनाते हुए लेबनान पर इज़राइल के हमले नहीं रुके तो वह युद्धविराम समझौते से हट जाएगा। मैक्रॉन ने चिंता व्यक्त की, जबकि पाकिस्तान ने युद्धविराम उल्लंघन के बीच संयम बरतने का आग्रह किया।

Web Title : Iran Warns US: Ceasefire Violation Will End Agreement After Lebanon Attack

Web Summary : Iran threatened to withdraw from the ceasefire agreement if Israel's attacks on Lebanon, targeting Hezbollah, don't stop. Macron expressed concern, while Pakistan urged restraint amid ceasefire violations.