इसिसच्या १० वर्षांच्या दहशतवाद्याने उडवले ओलीसाचे शीर
By Admin | Updated: February 5, 2016 16:40 IST2016-02-05T16:37:42+5:302016-02-05T16:40:58+5:30
इस्लामिक स्टेटचा प्रपोगंडा करणारा नवा व्हिडीयो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये १० वर्षांचा मुलगा मोठ्या सु-याने शरणार्थी सैनिकाचा शिरच्छेद करत असल्याचं चित्रण आहे.

इसिसच्या १० वर्षांच्या दहशतवाद्याने उडवले ओलीसाचे शीर
नवी दिल्ली, दि. ५ - इस्लामिक स्टेटचा प्रपोगंडा करणारा नवा व्हिडीयो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये १० वर्षांचा मुलगा मोठ्या सु-याने शरणार्थी सैनिकाचा शिरच्छेद करत असल्याचं चित्रण आहे.
१७ मिनिटांच्या या व्हिडीयोत इंग्रजीमध्ये हा मुलगा बोलत असून तो अमेरिकेला बजावताना दिसत आहे. अमेरिका, बघ हे ते सैनिक आहेत ज्यांना तू पैसे नी शस्त्र दिलीस आणि इस्लामच्या शरीयतसी लढायला पाठवलंस असं बोलताना तो मुलगा दिसत आहे. इस्लमिक स्टेट दाबिकच्या टेकड्यांमध्ये शत्रूचा मुकाबला करेल असंही या मुलानं म्हटलं आहे.
अलेप्पोमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेल्या इस्लामिक स्टेटच्या अबू दारदा या दहशतवाद्याचा हा १० वर्षांचा मुलगा असल्याचा अंदाज आहे. भगव्या रंगाच्या कपड्यात असलेला हा शरणार्थी सैनिक बंडखोर गटाचा असल्याची शक्यता आहे.
अवघ्या १० वर्षांच्या या मुलाने या बेड्या घातलेल्या शरणार्थीला जंगलातून ओढत उघड्यावर आणलं, त्याला कॅमे-यासमोर गुढघ्यावर बसवलं आणि त्याच्या गळ्यावरून सुरी फिरवली. इस्लामिक स्टेटची क्रूरता दाखवणारा हा आणकी एक व्हिडीयो आहे