शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आयसिसकडून काबूल विमानतळावर हल्ला; अमेरिकेच्या विमानांना केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 08:33 IST

अमरिकेने रविवारी ड्राेनचा वापर करुन काबूलमध्ये एअर स्ट्राईक केला हाेता.

काबूल : काबूल विमानतळावर दहशतवादी संघटना आयसिसने राॅकेट हल्ला करून अमेरिकन विमानांना लक्ष्य केले. अमेरिकेन सैन्य माघारीची अखेरच्या टप्प्यातील उड्डाणे सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आला. मात्र, त्यात काेणत्याही प्राणहानीचे वृत्त नाही. तर, अमेरिकेने काबुलमध्ये रविवारी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ७ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. या कारवाईमुळे तालिबानचा तीळपापड झाला असून ही कारवाई चुकीची असल्याचे तालिबानने म्हटले आहे. 

अमरिकेने रविवारी ड्राेनचा वापर करुन काबूलमध्ये एअर स्ट्राईक केला हाेता. त्यात आयसिसच्या खाेरासान गटाच्या आत्मघाती हल्लेखाेरांना लक्ष्य करण्यात आले हाेते. त्यानंतर आयसिसने काबूल विमानतळावर एका कारमधून राॅकेट हल्ला केला. अमेरिकेच्या संपूर्ण माघारीसाठी एकच दिवस शिल्लक असताना आयसिसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकन विमानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. विमानतळाजवळून ५ राॅकेट डागले. अमेरिकन सैन्याचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी या घटनेला दुजाेरा दिला आहे. 

पुरुष शिक्षकांनी मुलींना शिकविण्यावर बंदी

मुलामुलींनी एकत्र सहशिक्षण घेण्यावर तालिबानने बंदी आणलीच होती. आता पुरुष शिक्षकांनी मुलींना शिकवण्यासही तालिबानने प्रतिबंध केला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सत्ताधाऱ्यांचे उच्च शिक्षणमंत्री शेख अब्दुल बाकी हक्कानी यांनी सांगितले की, शरियत कायद्याप्रमाणेच आमच्या देशातील शिक्षणसंस्थामध्ये शिक्षण दिले जाईल.

नागरिकांकडील शस्त्रे ताब्यात घेण्याची मोहीम

अफगाणिस्तान कायदा व सुव्यवस्थेचे राज्य नांदावे यासाठी नागरिकांकडील शस्त्रे ताब्यात घेण्याची मोहीम तालिबानने सुरू केली आहे. तालिबानी नागरिकांकडील शस्त्रे ताब्यात घेत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकला आहे. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आले असले  तरी त्यांना विरोध करणारा मोठा वर्ग तिथे आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान