Iraq: चेकपॉइंटवर ISIS चा प्राणघातक हल्ला, 13 पोलिसांचा मृत्यू तर काही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 14:58 IST2021-09-05T14:54:55+5:302021-09-05T14:58:13+5:30
ISIS Attack on Iraq: आज इराकवर झालेला हल्ला या वर्षातील सर्वात मोठा हल्ला होता.

Iraq: चेकपॉइंटवर ISIS चा प्राणघातक हल्ला, 13 पोलिसांचा मृत्यू तर काही जखमी
बगदाद:इसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेनं इराकच्या उत्तरेकडील किरकुक शहरातील एका चेकपॉईंटवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत किमान 13 पोलिस ठार झाले असून, अनेकजण जखमी आहेत. इसिसचेदहशतवादी सतत इराकी पोलीस आणि लष्कराला लक्ष्य करत आहेत. इराक पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी पहाटे झालेला हा हल्ला वर्षातील सर्वात मोठा हल्ला आहे.
https://t.co/wxF7g0baRU
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021
व्हिडिओ खूप व्हायरल होत असून, त्यावर विविध कमेंट्सही येत आहेत.#socialmedia
इराकी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरकुक शहरातील फेडरल पोलीस चौकीला इसिसच्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. यात हल्ल्यात आतापर्यंत 13 पोलिसांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी आहेत. दरमम्यान, इसिसने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही.
https://t.co/KFexRImUHz
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021
'सरकारकडून भ्रमनिरास झाला असेल तर राजू शेट्टींनी सरकारमधून बाहेर पडावं.'#RajuShetti#sadabhaukhot
इराकवर इसिसचे अनेक हल्ले
इराकच्या सरकारने 2017 मध्ये इसिसचा पराभव केल्याचे जाहिर केले होते. पण, इसिस आता त्यांच्या स्लीपर सेल्सच्या मदतीने इराकमध्ये हल्ले घडवून आणत आहे. उत्तर इराकमधील दहशतवादी सतत इराकी सैन्य आणि पोलिसांना लक्ष्य करत आहेत. यापूर्वी 19 जुलै रोजी इसिसने सादर शहरातील अल-वोहेलाट बाजारावर हल्ला केला होता. त्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता.