बलुचांना ISI घाबरले, मुख्यालयाजवळील घरे पाडली; दररोज रात्री कर्फ्यू देखील लागू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:07 IST2026-02-26T14:57:07+5:302026-02-26T15:07:14+5:30
पाडण्यात आलेल्या इमारतींपैकी एक इमारती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे नेते बशीर झेब बलोच यांचे वडिलोपार्जित घर होते. पाडण्यात आलेल्या इमारतींमध्ये इतर अनेक राजकीय व्यक्तींचेही घर होते.

बलुचांना ISI घाबरले, मुख्यालयाजवळील घरे पाडली; दररोज रात्री कर्फ्यू देखील लागू होणार
पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानमधील नुश्की जिल्ह्यातील काझियाबाद भागात आयएसआय मुख्यालयाजवळील अनेक घरे पाडली आहेत. काही दिवसांपूर्वी रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, यामध्ये त्यांना तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले होते.'जर त्यांनी निर्दिष्ट वेळेत घर सोडले नाही तर इमारती जमीनदोस्त केल्या जातील, असे नोटीसमध्ये म्हटले होते. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी लष्कराने स्फोटके आणि इतर जड उपकरणांचा वापर करून अनेक घरे पाडली आहेत. आयएसआयजवळ बांधलेल्या या इमारतींमुळे हल्ल्याचा धोका निर्माण झाला होता, म्हणूनच त्या पाडण्यात आल्या.
प्रफुल्ल पटेल यांचा एव्हीएशनमध्ये तगडा संपर्क, मदत केली असती तर...; रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत
पाडण्यात आलेल्या इमारतींपैकी एक बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे नेते बशीर झेब बलोच यांचे वडिलोपार्जित घर आहे. याशिवाय इतर अनेक राजकीय व्यक्तींची घरेही पाडण्यात आली आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ऑपरेशन हारोफनंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. पाकिस्तान या भागातील बलुचिस्तान लोकांपासून घाबरत होता, असे मानले जाते. यामुळे त्यांनी त्यांची घरेही पाडली आहेत. इतकेच नाही तर बलुचिस्तान पोस्टमधील एका वृत्तात म्हटले आहे की कच्छ आणि ग्वादर सारख्या भागात इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
दररोज संध्याकाळी ६ नंतर कर्फ्यू लागू
प्रशासनाने दररोज संध्याकाळी ६ नंतर तेथे कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे नुश्कीच्या काझियााबाद जिल्ह्यातील रहिवाशांचे म्हणणे आहे. स्थानिकांच्या मते, जोपर्यंत रहिवासी पाकिस्तानच्या समर्थनार्थ रॅली काढत नाहीत आणि त्यांच्या घरांवर पाकिस्तानी झेंडे लावत नाहीत तोपर्यंत कर्फ्यू लागू राहील, असा सुरक्षा दलांनी इशारा दिला आहे. हे आर्थिक संस्थांवर देखील लागू करण्यात आले आहे. ३१ जानेवारी रोजी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अनेक शहरांमध्ये ऑपरेशन हेरफ सुरू केल्यापासून पाकिस्तानने ही कारवाई केली आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एकाच वेळी अनेक शहरांवर हल्ले करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. तेव्हापासून पाकिस्तानी सरकार आणि लष्कर घाबरलेल्या स्थितीत आहे. हल्ल्यांदरम्यान बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने नुश्की शहराला वेढा घातला होता. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्याने ही कारवाई केल्याचे मानले जाते. शिवाय, आयएसआय मुख्यालयावर हल्ला होण्याची भीती आहे.